VIRAL VIDEO : अंबरनाथमध्ये क्रूरतेचा कळस! १२व्या मजल्यावरून मांजरीला ढकलल्याचा धक्कादायक VIDEO व्हायरल

Ambernath Crime : अंबरनाथ पूर्वेतील रॉयल फ्लोरा फेज-२ येथे मांजरीला १२व्या मजल्यावरून ढकलल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.संपूर्ण घटना इमारतीतील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
अंबरनाथमध्ये क्रूरतेचा कळस! १२व्या मजल्यावरून मांजरीला ढकलल्याचा धक्कादायक VIDEO व्हायरल
अंबरनाथमध्ये क्रूरतेचा कळस! १२व्या मजल्यावरून मांजरीला ढकलल्याचा धक्कादायक VIDEO व्हायरलsaam tv
Published On

अंबरनाथमधून एक धडकी भरवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अंबरनाथच्या पालेगाव परिसरात ही घटना घडली आहे. एका मांजरीला उंच इमारतीवरून ढकल्ल्याने मांजरीचा मृत्यू झाला आहे . हा सगळा प्रकार इमारतीमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये कैद झाला आहे.हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

अंबरनाथ पुर्वेच्या रॉयल फ्लोरा फेज २ वर या आहे. इमारतीच्या A विंगच्या १२ व्या मजल्यावर हा प्रकार घडला आहे. रविवारी २६ जुलै रोजी रात्री हा प्रकार घडला आहे. सीसीटिव्ही फूटेजमध्ये मांजर १२ व्या मजल्यावरील डक्टच्या भिंतीवर चालत होती. माणूस आपल्या दिशेने येतोय हे कळताच ती बाजूला देखील होत होती. पण वृद्ध विकृत माणसाने त्या मांजरीला ढकलून दिले. त्यानंतर तो वृद्ध मांजर मेली आहे की नाही? हे खाली वाकून देखील पाहत होता.

अंबरनाथमध्ये क्रूरतेचा कळस! १२व्या मजल्यावरून मांजरीला ढकलल्याचा धक्कादायक VIDEO व्हायरल
Reservation : आई-वडील दोघेही IAS अधिकारी, तरीही आरक्षणाची मागणी का? सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या विकृत इसमावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. प्राणी संरक्षण कायद्यानुसार या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. परंतु या वृद्धाने असे कृत्य का केले? याबाबत अद्याप ठोस कारण समोर आलेले नाही. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com