Devendra Fadnavis saam tv
मुंबई/पुणे

Andheri East Bypoll Election : हार दिसली म्हणून निवडणुकीतून माघार घेतली का? फडणवीस म्हणाले...

निवडणुकीत हार दिसली म्हणून माघार घेतली का? असा प्रश्न पत्रकारांनी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना विचारला.

Satish Daud

Devendra Fadnavis On Andheri East Bypoll Election : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजप आणि शिंदे गटाने अचानक माघार घेतली. त्यामुळे पोटनिवडणुकीत शिवसेना (Shivsena) उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. दरम्यान, निवडणुकीत हार दिसली म्हणून माघार घेतली का? असा प्रश्न पत्रकारांनी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना विचारला. यावर फडणवीसांनी उत्तर दिलं आहे. (Maharashtra News)

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

'अंधेरी पोटनिवडणुकीच्या संदर्भात आमच्याकडे बराच विचार झाला. विशेषत: कार्यकर्त्यांचं मत होतं आणि निवडणूक लढवली पाहिजे, मुंबई युनिटचही मत होतं की आम्ही निवडणूक लढवली पाहिजे, मुरजी पटेल यांच्यासारखा उमेदवार ज्यांनी अपक्ष म्हणून देखील 45 हजार मतं घेतले होते. तो उमेदवार आम्ही उभा केला होता. त्यामुळे आम्हाला निवडून येण्याची पूर्ण गॅरंटी होती'. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

म्हणून आम्ही निवडणुकीतून माघार घेतली : फडणवीस

'निवडणुकीतून माघार घ्यावी म्हणून काही ज्येष्ठ लोकांनी आम्हाला विनंती केली होती. राज ठाकरे आणि शरद पवार साहेब यांनीही आम्हाला माघार घेण्याची विनंती केली होती. काही लोकांनी समोरून केली काही लोकांनी पाठिमागून केली. आता मागून कुणी केली आहे हे विचारू नका, राजकारणात सगळ्या गोष्टी सांगायच्या नसतात. असंही फडणवीस म्हणाले. (Breaking Marathi News)

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, की अजून काही लोकांनी आम्हाला निवडणुकीतून माघार घ्यायची विनंती केली. या गोष्टीवर विचार करून मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसोबत बोललो, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत आमची चर्चा झाली आणि त्यानंतर आम्ही निवडणुकीतून माघार घेतली' असं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.

'निवडणुकीतून माघार घ्यायचा हा काही पहिलाच निर्णय नाही'

'पोटनिवडणुकीतून माघार घ्यायचा हा काही पहिलाच निर्णय नाही. यापूर्वी देखील आम्ही असे निर्णय घेतले आहेत. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर पाटील गेले होते तेव्हा देखील आम्ही असाच निर्णय घेतला होता. पतंगरावजी कदम सुद्धा गेले होते तेव्हाही आम्हीच असा निर्णय घेतला होता. काही लोकं छोट्या मनाचे असतात, त्यामुळे तुम्ही कसाही निर्णय घेतला तरी ते त्यासंदर्भात बोलत असतात. पण आता ते जे काही बोलले आहे त्याला उत्तर आम्ही ग्रामपंचायत निवडणुकीतून दिलं आहे. असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT