Maharashtra Gram Panchayat Election Results 2022 : राज्यातील १८ जिल्ह्यातील एकूण १ हजार ७९ ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहे. या निवडणुकींचे प्राथमिक कल हाती आले आहेत. या निकालांमध्ये भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष असून त्या खालोखाल काँग्रेस, ठाकरे गट, शिंदे गट, राष्ट्रवादी या पक्षांना यश मिळाल्याचं चित्र दिसत आहे. (Maharashtra News)
रत्नागिरी (ratnagiri) जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचेही निकाल हाती आले असून या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने बाजी मारली आहे. ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी राजापूर, लांजा आणि रत्नागिरी तालुक्यात आपले वर्चस्व कायम ठेवत शिंदे गटाच्या शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे.
जिल्ह्यातील एकूण 24 ग्रामपंचायतींवर ठाकरे गट शिवसेनेने आघाडी घेतली असून शिंदे गटाला मात्र जिल्ह्यात फक्त 7 ग्रामपंचायतींवर समाधान मानावे लागले आहे. दापोली विधानसभा मतदार संघात मात्र शिंदे गटाने बाजी मारली असून विद्यमान आमदार योगेश कदम यांनी 10 पैकी 8 ग्रामपंचायतींवर विजयी झेंडा फडकवून पुन्हा एकदा दापोली विधानसभा मतदार संघावर आपलेच वर्चस्व असल्याचे सिद्ध केले आहे.
खेड तालुक्यातील अस्तान गावातील निवडणूक निकालावर एका उमेदवाराने आक्षेप घेत फेरमतदानाची मागणी केली आहे. तर गुहागर विधानसभा मतदार संघात आमदार भास्कर जाधव यांनी देखील आपले वर्चस्व कायम ठेवत गुहागर तालुक्यातील 5 पैकी 2 ग्रामपंचायतींवर ठाकरे गटाचा झेंडा फडकवला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात 51 पैकी 15 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने प्रत्यक्ष 36 ग्रामपंचयतींसाठी निवडणूक झाली. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला 24, शिंदे गट शिवसेना 7, भाजपा 1, राष्ट्रवादी 2, काँग्रेस 0 तर इतर 17 असा निकाल जाहीर झाला आहे. जिल्ह्यात खेड तालुक्यातील अस्तान गावात एकाच ठिकाणी निकालावर आक्षेप घेत फेर मतदानाची मागणी करण्यात आली आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.