Anand Dave Has Slamed To MP Vinayak Raut Saam Tv
मुंबई/पुणे

Hindutva Politics: "शिवसेनेच्या उभारणीत 'शेंडी जानव्याचं' योगदान काय ते ठाकरेंना विचारावं" - आनंद दवे

Aanand Dave Latest News: पुण्यात (Pune) ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी राऊतांना इशारा दिला आहे.

साम टिव्ही

ज्ञानेश्वर हिंगोलीकर, पुणे

पुणे: शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी हिदुत्वाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकारण चांगलचं तापलं आहे. "शिवसेनेचं हिंदुत्व हे व्यापक आहे; शेंडी-जानव्याचे नाही. शिवसेनेच्या हिंदुस्थानात मुसलमानामसह अन्य धर्मीयही येतात" असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी शिवसंपर्क मेळाव्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या औरंगाबादमधील पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्याचे आज पडसाद पडायला सुरुवात झालीय. याबाबत आता पुण्यात (Pune) ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी राऊतांना इशारा दिला आहे. (Anand Dave President Of bramhan Mahasangh Has Slamed To MP Vinayak Raut For His Statement On Brahman Hindutva)

हे देखील पहा -

आनंद दवे यांनी खासदार विनायक राऊतांना धारेवर धरलं आहे, ते म्हणाले की, शेंडी, जानवं आणि शिवसेना यांचं जरी नातं त्यांना माहित असतं तर ते असे बोलले नसते. शिवसेनेच्या उभारणीत शेंडी जानव्याचं काय योगदान आहे ते ठाकरेंना विचारावं. याच काश्मिरी शेंडी, जानव्यासाठी वंदनीय बाळासाहेब यांनी काय काय केले होते त्याचा तरी त्यांनी अभ्यास करावा असा खोचक टोला त्यांनी राऊतांना लगावला आहे, तसेच ब्राम्हण समाजाने विनायक राऊतांना महत्व देऊ नये असं आवाहन त्यांनी ब्राम्हण समाजाला केलं आहे.

त्याचप्रमाणे औरंगाबादमध्येही (Aurangabad) याचे पडसाद उमटले आहेत. ब्राह्मण समन्वय समितीच्या वतीने खासदार विनायक राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आलाय. तसेच खासदार विनायक राऊत यांनी ब्राम्हण समाजाची माफी मागावी अन्यथा शिवसेनेवर बहिष्कार घालणार, असा इशारा ब्राह्मण समन्वय समितीचे कार्याध्यक्ष सुरेश देशपांडे यांनी दिला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Police : मुंबईत एसीबीची सर्वात मोठी कारवाई; पोलीस दलातील २ बड्या अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं

Chhagan Bhujbal: आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार, ओबीसींसाठी भुजबळांचा एल्गार

Raipur Steel plant : स्टील प्लांटमध्ये मोठी दुर्घटना; ६ कामगारांचा मृत्यू, अनेक जण दबल्याची भीती

Maharashtra Live News Update: पुण्यात रस्त्याच्या मागणीसाठी तीन गावातील गावकऱ्यांचे आमरण उपोषण

Amla For Hair: आवळ्याचा केसांवर कोणता परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT