सावधान! वाढत्या उष्णतेमुळे स्वस्तातले गॉगल्स घालताय? 'हे' जाणून घ्या

आपण जर डोळ्याची काळजी घेण्यासाठी रस्त्या शेजारील स्वस्तातले गॉगल घेत असाल तर सावधान!
Wearing Goggles
Wearing GogglesSaam Tv
Published On

सिद्धेश म्हात्रे

आपण जर डोळ्याची काळजी घेण्यासाठी रस्त्या शेजारील स्वस्तातले गॉगल घेत असाल तर सावधान! स्वस्तातले गॉगल आपल्या डोळ्याचा घात करू शकतात. जाणून घेऊयात काय आहेत स्वस्तातील गॉगल्स चे दुष्परिणाम व काय आहेत त्यावरील उपाययोजना. (Disadvantages Of Wearing Cheap Goggles)

सध्या मार्चमध्येच कडक उन्हामुळे (Summer Season) नागरिक हैराण झाले आहेत. या कडक उन्हापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. आपले डोळे हे शरारील अतिशय महत्वाचा अवयव आहे त्यामुळे या उष्ण वातावरणात डोळ्यांची देखील काळजी घेणे तेवढेच महत्वाचे आहे. आपण डोळ्यांची काळजी घेण्यासाठी गॉगल्सचा वापर करतो. काहीजण हे महामार्गावर दुकान थाटून बसलेल्या दुकानदारांकडून गॉगल्स खरेदी करून ते वापरतात. मात्र डोळ्यांची काळजी घेण्यासाठी आपण वापरत असलेले स्वस्तात मिळणारे हे गॉगल्स आपल्या डोळ्यांसाठी अत्यंत हानिकारक आहेत. होय !

Wearing Goggles
लग्न म्हणजे पत्नीवर अत्याचार करण्याचा परवाना नाही; बलात्कार हा बलात्कारचं- कर्नाटक HC

काय आहे दुष्परिणाम?

पैसे वाचविण्यासाठी आपण हे स्वस्त गॉगल्स वापरतो खरे, मात्र त्याचे गंभीर दुष्परिणाम भविष्यात आपल्याला सहन करावे लागू शकतात. स्वस्त गॉगल्समध्ये वापरण्यात येणारी काच व फायबर तांत्रिकदृष्ट्या डोळ्यांसाठी योग्य नसते. यामुळे डोळ्यांची जळजळ होणे तसेच डोकेदुखी होणे तसेच पुढे जाऊन मोतीबिंदू सारखे गंभीर आजारही होऊ शकतात. त्यामुळे डोळ्यांची नीट काळजी घ्यायची असल्यास योग्य सल्ला घेऊन चांगले गॉगल्स वापरावे असा सल्ला नेत्र तज्ञ देत आहेत.

हे देखील पहा-

ब्रँडेड गॉगल्स महाग पण..;

ब्रँडेड गॉगल्स महाग जरी असले तरी ते डोळयांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बनवलेले असतात. तसेच त्यात वापरले जाणारे मटेरियल डोळ्यांना हानी पोहचवणारे नसते. त्यामुळे चांगले गॉगल्स वापरणे डोळ्यांच्या सुरक्षिततेसाठी चांगले असून यामध्ये सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी करणे, डोळ्याला हानिकारक असणारे यूव्ही लाईट ब्लॉक करणे तसेच डोळ्यांना थंड ठेवण्याचे काम पोलराईज्ड गॉगल्स करत असतात. त्यामुळे नागरिकांनी चांगल्या गॉगल्सचा वापर करण्याचा सल्ला गॉगल्स व्यावसायिक करत आहेत.

एकूणच डोळ्यांची काळजी घेणे व स्टाईल म्हणून गॉगल वापरणे यात बराच फरक असून स्वस्तातले गॉगल तुमचे काही पैसे वाचवत मात्र दीर्घकालीन दुष्परिणाम देऊन जातील याची काळजी नागरिकांनी घेणं आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com