Amul Milk Price Hike Saam TV
मुंबई/पुणे

Amul Milk Rate : अमूल कंपनीने वाढवले दुधाचे दर, आता एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागणार? जाणून घ्या

Amul Milk Price Hike: महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांना आणखी एक मोठा झटका बसला आहे. जून महिन्याच्या सुरुवातीलाच दुधाच्या दरात वाढ झाली आहे.

Satish Daud

महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांना आणखी एक मोठा झटका बसला आहे. जून महिन्याच्या सुरुवातीलाच दुधाच्या दरात वाढ झाली आहे. गुजरातच्या प्रसिद्ध अमूल कंपनीने दुधाचे दर प्रतिलीटर २ रुपयांनी वाढवले आहेत. आजपासून म्हणजेच सोमवारपासून ही दरवाढ करण्यात आली आहे.

अमूल कंपनीने अमूल गोल्ड, अमूल ताज आणि अमूल शक्ती या तिन्ही कंपन्यांच्या दूध दरात वाढ केली आहे. अमूल ताजाच्या छोट्या पिशव्यांच्या किमतीमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. म्हणजे छोट्या पिशव्यांमधील दूध आहे त्या किमतीमध्येच मिळणार आहे.

अमूलने दूधाच्या दरातील वाढ संपूर्ण देशभरात केली आहे. नवीन किमतींनुसार अमूल गोल्ड अर्धा लिटर दूध आता ३२ रुपयांवरून ३३ रुपयांना मिळणार आहे. तर, अमूल ताजा अर्धा लिटर दुधाचे दर २६ रुपयांवर २७ रुपये इतके झाले आहेत.

अमूल शक्ती ५०० मिली दूध आता ३० रुपयांना मिळणार आहे. तर १ लिटर दुधासाठी लोकांना आता ६६ रुपये द्यावे लागणार आहेत. याआधी दुधाचे दर ६४ रुपये इतके होते. या दूध दरवाढीचा परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर होणार आहे.

दरम्यान, गुजरात मिल्क मार्केटिंग फेडरेशनने अमूल दूध दरात शेवटची वाढ ही फेब्रुवारी २०२३ मध्ये केली होती. शेतकऱ्यांना उत्पादनासाठी वाढलेला खर्च भरून निघावा यासाठी ही वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा अमूल दूध दरात वाढ करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात आले दोन-दोन जॉली; अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांनी स्पर्धकांची घेतली शाळा

Pooja Khedkar : नवी मुंबईतून ट्र्क हेल्परचं अपहरण, पुण्यात पूजा खेडकरच्या घरी आढळला; काय आहे संपूर्ण प्रकरण?

Gadchiroli Police : घातपाताचा उद्देशाने ताडगाव जंगल परिसरात माओवाद्याकडून रेकी; गडचिरोली पोलिसांनी घेतले ताब्यात

Ind Vs Pak सामना खेळणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंना काळं फासणार, शिवसेना नेत्याचा इशारा

Maharashtra Politics: 'देवा तूच सांग' नाशिकमध्ये शरद पवार गटाने भाजपला डिवचले; शहरात 'या' बॅनरची चर्चा|VIDEO

SCROLL FOR NEXT