War In Aaditya Thackeray BJP Yandex
मुंबई/पुणे

Amitabh Bachchan: कोस्टल रोड, अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट; भाजप अन् आदित्य ठाकरेंमध्ये रंगलं ट्विट वॉर

Rohini Gudaghe

जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या X अकाउंटवर कोस्टल रोडवर (Coastal Road Mumbai) एक पोस्ट केली आहे. त्यांच्या पोस्टला भाजपने ट्विट करत धन्यवाद केलं आहे, त्यावरून आता आदित्य ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे. अमिताभ बच्चन यांच्या पोस्टमुळे नवीन राजकीय वादाला तोंड फुटल्यांचं दिसलं आहे. अनेकांचं लक्ष या पोस्टने वेधल्याचं दिसत आहे. सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सगळेच पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशाताच आता अमिताभ बच्चन यांनी एक ट्वीट केलंय. अमिताभ बच्चन यांच्या या ट्वीटनं आता सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

अमिताभ बच्चन यांच्या पोस्टमध्ये काय?

T 4999 - अरेरे! कामाला निघालो.. सी लिंक नंतर कोस्टल रोड आणि बोगदा अंडरग्राउंड.. JVPD, जुहू ते मरीन ड्राइव्ह, 30 मिनिटे..!! वाह ! काय बात है ! साफ़ सुथरी नयी वाढिया स्ट्रीट, कोणतीही रुकावट नाही, असं ट्विट (Amitabh Bachchan Tweet On Coastal Road) अमिताभ बच्चन यांनी केलं आहे.

अमिताभ बच्चन यांच्या पोस्टवर भाजपची प्रतिक्रिया

अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या केलेल्या कोस्टल रोडच्या पोस्टला भाजपने (BJP) प्रतिक्रिया दिली आहे. त्यामध्ये त्यांनी "आज आपल्याकडे कोस्टल रोड आहे… धन्यवाद अमिताभ बच्चन जी, धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई कोस्टल रोडबोगद्यामधून तुम्ही प्रवास केला आहे, याचा आनंद असल्याचं म्हटलं आहे. देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्याचे विकासपुरुष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मुंबईकरांचा प्रवास वेगवान होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भविष्यामध्ये देखील मुंबईकरांना आणि जनतेला उत्तम दर्जाचे रस्ते आणि पायाभूत सोयीसुविधा मिळणार आहेत, ही मोदींची गॅरंटी असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

आदित्य ठाकरेंची भूमिका

आदित्य ठाकरेंनी भाजपच्या या पोस्टवर टीका (Aaditya Thackeray) केली आहे. त्यांनी भाजपचा कोस्टल रोडशी काहीही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. त्यांनी त्यांच्या या पोस्टमध्ये कोस्टल रोडसंबंधी माहिती दिली आहे. या प्रकल्पाशी भाजपचा काहीही संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी प्रकल्पाची घोषणा आणि अंमलबजावणी उद्धव ठाकरेंनी केल्याचं म्हटलं आहे. अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार १४२००० पगार; असा करा अर्ज

Salman Khan News: 'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट हाल...', सलमान खानला पुन्हा धमकी; ५ कोटींची मागणी

Maharashtra News Live Updates: नाशिकमधील भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT