Amit thackeray  saam tv
मुंबई/पुणे

...तर भविष्यात राजकारण करायला माणूस नावाचा प्राणी शिल्लकच राहणार नाही; अमित ठाकरेंची फेसबुक पोस्ट व्हायरल

मुंबईतील आरे कॉलनीत मेट्रो कारशेड उभारण्यावरून पुन्हा एकदा मुंबईतील राजकारण तापलं आहे. आरेतील प्रस्तावित कारशेड कांजूरमार्ग येथे नेण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला होता.

Nandkumar Joshi

मुंबई: मुंबईतील आरे कॉलनीत मेट्रो कारशेड उभारण्यावरून पुन्हा एकदा मुंबईतील राजकारण तापलं आहे. आरेतील प्रस्तावित कारशेड कांजूरमार्ग येथे नेण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे गट आणि भाजपचं सरकार सत्तेत आल्यानंतर हा निर्णय बदलून मेट्रो कारशेड प्रस्तावित आरेच्या जागेतच होणार असा निर्णय शिंदे सरकारने घेतला. त्यावर माझ्या पाठीत ज्या प्रमाणे खंजीर खुपसला तरा मुंबईच्या काळजात कट्यार खुपसू नका, असं म्हटलं होतं. त्यांना उत्तर देताना कारशेड आरेतच होणार, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितलं. ( Amit Thackeray News In Marathi )

प्रस्तावित मेट्रो कारशेडवरून उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांच्यात जुंपली असतानाच, मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र आणि पर्यावरणप्रेमी अमित ठाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आरेतील मेट्रो कारशेडबाबतच्या आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी विनंती केली आहे. तसेच पर्यावरण उद्ध्वस्त झालं तर, भविष्यात राजकारण करण्यासाठी माणूस नावाचा प्राणी शिल्लकच राहणार नाही, याचं भान सर्व राजकीय नेत्यांनी बाळगायला हवं, असं परखड मत अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी मांडलं आहे.

अमित ठाकरे यांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी...

'मेट्रो कारशेड आरे जंगलातच करण्याचा नव्या सरकारने घेतलेला निर्णय माझ्यासारख्या असंख्य पर्यावरणप्रेमींसाठी धक्कादायक आहे. आरेमध्ये कारशेड होऊ नये म्हणून शेकडो तरुण-तरुणींनी संघर्ष केला होता. काहींना तर पोलिसांनी गजाआड टाकलं होतं.

आपल्याला विकास हवाच आहे, पण पर्यावरणाचा बळी देऊन नको. आपलं पर्यावरण उद्ध्वस्त झालं तर भविष्यात राजकारण करायला माणूस नावाचा प्राणी शिल्लकच राहणार नाही, याचं भान सर्व राजकीय नेत्यांनी बाळगायला हवं. नवे मुख्यमंत्री आणि नवे उपमुख्यमंत्री यांनी आरेतील मेट्रो कारशेडबाबतच्या आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, ही आग्रहाची विनंती.'

मुंबईचा 'श्वास' असलेल्या आरेमध्ये मेट्रो कारशेड उभारणीवरून राजकीय वातावरण तापलं आहे. एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर मेट्रो कारशेड आरेमध्येच होणार असा निर्णय घेण्यात आला होता. त्यावर उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर टीका केली होती. त्याला उत्तर देताना फडणवीस यांनी कारशेड आरेतच होणार असे सांगितले होते. आरेमध्ये ज्या जागेवर कारशेडचे २५ टक्के काम झाले आहे. त्याच जागेवर १०० टक्के काम होईल. हे मुंबईच्या हिताचेच आहे. कारण मुंबईतील मेट्रो सुरू होऊ शकते. तर आरे जंगल वाचवण्यासाठी आम आदमी पक्ष मैदानात उतरला होता. त्यांच्या वतीने या निर्णयाचा विरोध करण्यात आला होता.

काय आहे कारशेडचा वाद?

तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळात आरे परिसरात कारशेड उभारण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. त्यासाठी शेकडो झाडे तोडण्यात आली होती.

याविरोधात पर्यावरण प्रेमींनी विरोध केला होता. शेकडो पर्यावरणप्रेमी आणि मुंबईतील नागरिक रस्त्यावर उतरले होते. तसेच आंदोलन करणाऱ्या पर्यावरणप्रेमींवर पोलिसांनी कारवाईही केली होती.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होताच पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने विचार करून कारशेड आरेतून कांजूरमार्ग येथे हटवण्याचा निर्णय घेतला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

IND vs AUS: बुमराह बॅटिंगला आला अन् रिषभ गोलंदाजीला; BCCI ने शेअर केला दोघांच्या जुगलबंदीचा VIDEO

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कराडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध

Assembly Election: बल्लारपूरमध्ये रंगणार तिरंगी लढत; सुधीर मुनगंटीवारांपुढे काँग्रेसच्या संतोष सिंह रावतांचं आव्हान

SCROLL FOR NEXT