Goa : ११ दिवसांनंतर बंडखोर आमदार मुंबईत परतणार; शिंदे सरकारमधील खातेवाटपाबाबत होणार चर्चा

Maharashtra Political News : हे आमदार गोव्यातून मुंबईकडे यायला निघाले आहेत तर काही आमदार हे स्पेशल विमानाने गोव्यातून मुंबईत येणार आहेत.
Rebel MLA to return to Mumbai after 11 days Discussions will be held on cabinet and posts in Eknath Shinde government maharashtra
Rebel MLA to return to Mumbai after 11 days Discussions will be held on cabinet and posts in Eknath Shinde government maharashtraTwitter/@mieknathshinde
Published On

रुपाली बडवे

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचं राजकीय नाट्य सुरु होतं. मात्र, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्यानंतर या सत्तानाट्याला पूर्णविराम लागला. एकनाथ शिंदेंचा शपथविधी झाला मात्र त्यावेळी त्यांना पाठिंबा देणारे सर्व आमदार अद्याप देखील गोव्यात आहे. पण हे सर्व आमदार (Rebel MLA's) आज मुंबईत परतणार आहेत. मुंबईत नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः सर्व आमदार आज मुंबईत परतणार असल्याचे स्पष्ट केले. हे आमदार गोव्यातून मुंबईकडे यायला निघाले आहेत तर काही आमदार हे स्पेशल विमानाने गोव्यातून मुंबईत येणार आहेत. मुंबईत आल्यानंतर शिंदे सरकारमध्ये मंत्रिमंडळ वाटपासाठी चर्चा होऊ शकते अशी माहिती सुत्रांनी दिले आहे. (Eknath Shinde Latest News)

हे देखील पाहा -

एकनाथ शिंदे गटाचे बंडखोर आमदार तब्बल ११ दिवसांनी मुंबईत परत येणार आहेत. गोव्यातील ताज सुरत (गुजरात), गुवाहाटी (आसाम) आणि पणजी (गोवा) अशा तीन राज्यांमधील प्रवासानंतर तब्बल ११ दिवसांनी हे बंडखोर आमदार पणजीहून मुंबईत येण्यासाठी रवाना झाले आहेत. गोव्यातल्या ताज कन्व्हेक्शन या हॉटेलात सर्व आमदारांना ठेवण्यात आलं होतं. यानंतर शिवसेना बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुंबईत येत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर आता हे सर्व बंडखोर गोव्याहून मुंबईला येत आहेत. मुंबईत आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत त्यांची बैठक होणार आहेय या बैठकीत शिंदे सरकारमधील खातेवाटप आणि मंत्रिपदासाठी चर्चा होणार आहेत. आज, शनिवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास बंडखोर आमदार मुंबई विमानतळावर दाखल होणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ताज प्रेसिटेंट हॉटेलमध्ये ७ वाजता बैठक होणार आहे. या बैठकीतच कॅबिनेट आणि मंत्रिपद या अनुषंगाने चर्चा होण्याची शक्यता आहे.

Rebel MLA to return to Mumbai after 11 days Discussions will be held on cabinet and posts in Eknath Shinde government maharashtra
CJI NV Ramana: कोर्टाने राजकीय अजेंडे चालवावेत असा गैरसमज सत्ताधाऱ्यांचा झालाय; सरन्यायाधीशांनी सुनावले खडे बोल

दुसरीकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सीआरपीएफचे दोन हजार जवान मुंबईत तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे कडक सुरक्षाव्यवस्थेत शिंदे गटच्या आमदारांना मुंबईत आणण्यात येणार आहे. दरम्यान, विधानसभेच्या अधिवेशनाची तारीख बदलण्यात आली आहे. विधानसभेचं अधिवेशन एक दिवस पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे २ आणि ३ जुलैला होणारे अधिवेशन आता ३ आणि ४ जुलै रोजी होणार आहे. नव नियुक्त सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी हे अधिवेशन बोलावलं आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com