CJI NV Ramana: कोर्टाने राजकीय अजेंडे चालवावेत असा गैरसमज सत्ताधाऱ्यांचा झालाय; सरन्यायाधीशांनी सुनावले खडे बोल

Chief Justice of India N V Ramana Latest News : देशातील राजकीय पक्षांमध्ये असा गैरसमज आहे की न्यायव्यवस्थेने राजकीय अजेंडा पुढे नेला पाहिजे असा टोला त्यांनी देशातील सर्व राजकीय पक्षांना लगावला आहे.
Judiciary is answerable only to the Constitution, says CJI N V Ramana
Judiciary is answerable only to the Constitution, says CJI N V RamanaTwitter/@lawbarandbench
Published On

कॅलिफोर्निया, अमेरिका : भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमण (Chief Justice of India N V Ramana) यांनी आज लोकशाहीतील न्यायपालिकेच्या भूमिकेवर मोठं वक्तव्य केलं आहे. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया येथे असोसिएशन ऑफ इंडो-अमेरिकन्सने (Association of Indo Americans) आयोजित केलेल्या कार्यक्रमात CJI रमण बोलत होते. आपल्या भाषणात, ते म्हणाले की भारतातील सत्ताधारी पक्षांना (ruling and opposition parties in india) अशी अपेक्षा आहे की प्रत्येक सरकारी कृती ही न्यायिक समर्थनास पात्र आहे. तर विरोधी पक्षांना देखील न्यायपालिकेने त्यांचा राजकीय अजेंडा पुढे नेण्याची अपेक्षा आहे. पण एकटी न्यायव्यवस्था ही घटना आणि संविधानाला उत्तरदायी आहे. भारताचे सरन्यायाधीश एन व्ही रमणा म्हणाले की, देशातील राजकीय पक्षांमध्ये असा गैरसमज आहे की न्यायव्यवस्थेने राजकीय अजेंडा पुढे नेला पाहिजे असा टोला त्यांनी देशातील सर्व राजकीय पक्षांना लगावला आहे. (Chief Justice of India N V Ramana Slams Indian Political Parties)

हे देखील पाहा -

राजकीय पक्षांवर टीकास्त्र

सरन्यायाधीश एनव्ही रमणा पुढे म्हणाले, आम्ही या वर्षी स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे करत आहोत. आपल्याला प्रजासत्ताक होऊन ७२ वर्षे होत असताना, मला खेदाने सांगावे लागेल की प्रत्येक संस्था राज्यघटनेने नेमून दिलेल्या भूमिका आणि जबाबदाऱ्यांचे पूर्ण पालन करायला शिकलेली नाही. सत्तेत असलेल्या पक्षाचा असा गैरसमज आहे की, सरकारचे प्रत्येक काम न्यायालयीन समर्थनास पात्र आहे असं म्हणत सरन्यायाधीशांनी राजकीय पक्षांना टोला लगावला आहे.

एकटी न्यायपालिका संविधानाला उत्तरदायी

भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमण पुढे म्हणाले की, अशी विचारप्रक्रिया संविधान आणि लोकशाहीच्या आकलनाच्या अभावामुळे उद्भवते. अशा शक्तींच्या मदतीला धावून येणारे सर्वसामान्यांचे अज्ञान आहे, ज्यांचे उद्दिष्ट एकमेव स्वतंत्र संस्था म्हणजेच न्यायव्यवस्था नष्ट करणे आहे. केवळ न्यायपालिका संविधानाला उत्तरदायी आहे, यावर त्यांनी भर दिला. भारतातील संवैधानिक संस्कृतीला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

Judiciary is answerable only to the Constitution, says CJI N V Ramana
Video Viral: रिषभ पंतनं ठोकलं शतक, राहुल द्रविडचं 'बाहुबली' स्टाइल सेलिब्रेशन, पाहा!

सहिष्णुता आणि सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देण्याची गरज

सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी भारतात सहिष्णुता आणि सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. याबाबत त्यांनी अमेरिकेचं उदाहरण दिले. ते म्हणाले की अमेरिकन समाजाचा सहिष्णुता आणि सर्वसमावेशक स्वभाव आहे जो जगभरातील सर्वोत्कृष्ट प्रतिभांना आकर्षित करण्यास सक्षम आहे, ज्यामुळे त्याच्या विकासास हातभार लागत आहे. आत्मविश्वास टिकवण्यासाठी वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील पात्र प्रतिभांचा आदर करणे देखील आवश्यक आहे. सर्वसमावेशकता समाजातील एकता मजबूत करते जी शांतता आणि प्रगतीची गुरुकिल्ली आहे. आपल्याला एकत्र करणाऱ्या मुद्द्यांवर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे, आपल्यात फूट पाडणाऱ्या मुद्द्यांवर नाही असं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com