'राज'पुत्राच्या आगमनाने मनसेचे ''कल्याण'' होणार? Saam Tv News
मुंबई/पुणे

'राज'पुत्राच्या आगमनाने मनसेचे ''कल्याण'' होणार?

मनसेची हवा दिसत असली तरी त्याचे मतांमध्ये परिवर्तन होताना दिसत नाही. त्यामुळे युवा आणि तरुण नेते म्हणून अमित ठाकरेंना जनमत मिळवण्यासाठी बराच संघर्ष करावा लागेल.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

कल्याण: मनसेचे नेते तथा राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आज कल्याणमध्ये आले आहेत. विशेष म्हणजे ते स्वतःच्या खाजगी वाहनाने आले नसून मुंबईच्या लोकल ट्रेनने प्रवास करत कल्याणात दाखल होणार आहेत. रस्त्यावरील खड्यांमुळे होणारा उशीर आणि त्रास कमी व्हावा यासाठी आपण ट्रेनने प्रवास करत असल्याचं अमित ठाकरे यांचं म्हणणं आहे. कल्याण-डोंबिवली शहरात पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी ते हा दौरा करत आहेत. (amit thackeray in kalyan, it is beneficial for mns)

हे देखील पहा -

मुंबई आणि उपनगरात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अमित ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहे. याबाबत ते सात्यत्याने सरकारवर टीका करत आहेत. कालच त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत सरकारवर निशाणा साधला. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, ज्या पक्षाच्या हातात गेली २५ वर्षे सत्ता आहे तो पक्ष रस्ते खड्डेमुक्त करु शकला नाही, मात्र नाशिकचे रस्ते पहा, नाशिकच्या रस्त्यांवर एकही खड्डा नाही. नाशिकमध्ये एकही खड्डा नाही, हे काय रॉकेट सायन्स नाही असा टोलाही त्यांनी लगावला.

निवडणुकीच्या दृष्टीने दौरा महत्वाचा

राज्यात पुढच्या वर्षी महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीने अमित ठाकरेंचे दौरे पक्ष बांधणीसाठी महत्वाचे आहेतय कधी नव्हे ते यंदा अमित ठाकरे राजकारणात चांगलेच अॅक्टीव्ह झाले आहे. नाशिक, पुणे आणि कल्याण-डोंबिवलीमध्ये पक्षाचे चांगले संघटन आहे. त्यामुळे नाशिकची महापालिका परत जिंकण्यासह पुणे,ठाणे,पालघर आणि कल्याण-डोंबिवलीकडे मनसेचे विशेष लक्ष दिसते. २०१० च्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेने २६ जागा जिंकल्या होत्या तर २०१५ मध्ये मनसेला केवळ १० जागाच जिंकता आल्या. त्यामुळे यंदा जास्त जागा जिंकण्यासाठी अमित ठाकरे स्वतः मैदानात उतरले आहेत.

शिवसेनेला आव्हान

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेती सत्ता असून भाजप विरोधी पक्षात आहे. मात्र यंदा भाजप-मनसे युतीची चर्चा आहे. त्यात महाविकास आघाडी महापालिका निवडणुका एकत्र लढवणार की स्वतंत्र यावरदेखील राजकीय समीकरणं बदलणार आहे. मात्र जर भाजप-मनसे युती झाली आणि महाविकास आघाडी वेग-वेगळी लढली तर त्याचा फटका शिवसेनेला बसू शकतो. शिवसेना महाविकास आघाडीत आल्याने हिंदुत्ववादी राहिली नसल्याची टीका भाजप आणि मनसेने अनेकदा केली आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेच्या पारंपारिक मतदाराला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न मनसे करतेय.

'राज'पुत्राच्या आगमनाने मनसेचे ''कल्याण'' होणार?

एकुणच पाहता मनसेची हवा दिसत असली तरी त्याचे मतांमध्ये परिवर्तन होताना दिसत नाही. त्यामुळे युवा आणि तरुण नेते म्हणून अमित ठाकरेंना जनमत मिळवण्यासाठी बराच संघर्ष करावा लागेल. कल्याण-डोंबिवली महापालिकेतील १२२ जागांपैकी मनसेला यावेळी किती जागा मिळेल? कल्याणकर यंदा मनसेला आशीर्वाद देतात का आणि 'राज'पुत्राच्या आगमनाने मनसेचे कल्याण होणार का हे येत्या निवडणुकीत कळेल.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री अंबाबाईच्या दर्शनाला

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

Azaad Teaser Released : अजय देवगणचा 'आझाद' येतोय; मामा-भाचा एकाच सिनेमात, अॅक्शनचा धमाका, टीझर पाहाच!

VIDEO : आम्हाला त्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, राज ठाकरेंच्या 'त्या' विधानावर राऊतांची प्रतिक्रिया | Marathi News

SCROLL FOR NEXT