Raj-Uddhav Thackeray Alliance  Saam Tv News
मुंबई/पुणे

Raj-Uddhav Thackeray Alliance : युतीच्या कॉलसाठी 'पहेले तुम, पहेले तुम'; ज्युनिअर ठाकरेंचा युतीसाठी ग्रीन सिग्नल?

Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance : ठाकरे बंधुंच्या युतीवर पहिल्यांदाच राज ठाकरेंचे पूत्र अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलीय. ज्यामुळे नव्या पिढीचा युतीसाठी ग्रीन सिग्नल असताना घोडं नेमकं अडलयं कुठं? असा प्रश्न विचारला जातोय.

Prashant Patil

सुप्रीम मस्कर, साम टिव्ही

मुंबई : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेंना आता वेग आलाय. साद-प्रतिसादानंतर सुरु झालेली युतीची चर्चा मध्यंतरी थंडावली होती. मात्र आता शिवसेना- मनसे युतीला ठाकरेंच्या नव्या पिढीचाही ग्रीन सिग्नल असल्याच चित्र दिसतंय. त्यामुळे आतातरी ठाकरे बंधू ज्युनिअर ठाकरेंच्या मध्यस्थीनं एकत्र येतील का? असा प्रश्न विचारला जातोय.

एकीकडे युतीच्या चर्चा सुरु असताना डोंबिवलीतील पलावा पुलाच्या मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेने आणि मनसेनं एकत्र आंदोलन केलं होतं. तो युतीचा भाग होता, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी युतीच्या चर्चांना आधीच ग्रीन सिग्नल देऊन टाकलाय. ठाकरे सेना युतीसाठी सकारात्मक असल्याचं बोललं जातयं. त्यात आदित्य आणि अमित ठाकरेंनी युतीला ग्रीन सिग्नल दिलाय. मात्र नव्या पिढीची हे दोन्ही ठाकरे युतीसाठी सकारात्मक असताना ठाकरे बंधूंनी युतीवर अद्याप मौन का बाळगलयं? पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं युतीच्या चर्चांना उधाण आणून दोन्ही ठाकरे राजकीय अस्तित्त्वाची चाचपणी करतायत का? पालिका निवडणुकीत एकत्र येण्यासाठी ठाकरे बंधू कोणती नवी रणनिती आखतील? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT