Amit Shah On Manipur: Saam Tv
मुंबई/पुणे

Assembly Election 2024: विदर्भ, मराठवाड्यानंतर मिशन मुंबई! अमित शहांची खास रणनिती; भाजप आमदारांचं टेन्शन वाढवलं

Amit Shah Focus On Mumbai Assembly Seats: दोन दिवसांपूर्वीच अमित शहांनी विदर्भ, मराठवाड्यातील मतदारसंघांची चाचपणी केली. त्यानंतर आता भाजप श्रेष्ठींनी मुंबवर लक्ष केंद्रित केले असून विशेष रणनिती आखली आहे.

Gangappa Pujari

गणेश कवाडे, मुंबई|ता. २७ सप्टेंबर

Maharashtra Assembly Election 2024: राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लोकसभेत पिछेहाट झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने विधानसभेत सावध पवित्रा घेतला आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी लक्ष केंद्रित केले आहे. दोन दिवसांपूर्वीच अमित शहांनी विदर्भ, मराठवाड्यातील मतदारसंघांची चाचपणी केली. त्यानंतर आता भाजप श्रेष्ठींनी मुंबवर लक्ष केंद्रित केले असून विशेष रणनिती आखली आहे.

विदर्भ, मराठवाड्यानंतर भाजप नेते अमित शहांनी राजधानी मुंबईवर लक्ष केंद्रीत केले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मुंबईमध्ये मोठा फटका बसला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत या चुका टाळण्यासाठी स्वतः अमित शहांनी मुंबईसाठी विशेष प्लॅनिंग केले आहे. मुंबईमधील मतदाहसंघांचा स्वतः अमित शहा आढावा घेणार असून डेंजर झोनमध्ये असलेल्या जागांकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, लवकरच अमित शहा मुंबई दौऱ्यावर येणार असून भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. अमित शहांच्या या दौऱ्याआधी महाराष्ट्र भाजप अलर्ट मोडवर आला असून पुढील तीन दिवसात मतदारसंघ पिंजून काढण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. पुढच्या तीन दिवसात मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा एक रिपोर्ट तयार केला जाणार आहे.

हा रिपोर्ट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सादर केला जाणार आहे. त्यामुळे ज्यांची कामगिरी समाधान कारक नाही त्या आमदारांचे टेंशन चांगलेच वाढणार आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी झालेल्या विदर्भ तसेच मराठवाडा दौऱ्यातही अमित शहांनी भाजप कार्यकर्त्यांना महत्वाचे आदेश दिले आहेत. काहीही करुन राज्यामध्ये सत्ता आणायची असून त्यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना रोखावे लागणार आहे, असं ते म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उमेश पाटलांच्या पराभवानंतर अनगर मध्ये भाजपकडून जल्लोष

Vati Mangalsutra Designs: पारंपारिक सौंदर्याचा तोरा, वाटी मंंगळसूत्राच्या या 5 लेटेस्ट डिझाईन्स पाहून तुम्ही पडाल प्रेमात

Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates : उमेश पाटलांच्या पराभवानंतर भाजपकडून जल्लोष

राज ठाकरेंचा भाजप-काँग्रेसला दणका; एकही सभा न घेता जिल्हा परिषदेत इंजिन धावलं

Raigad Zilla Parishad Election Result: रायगडमध्ये अजित पवार गटाची हवा; भाजप तिसऱ्या नंबरवर, शेकापच्या हाती भोपळा, वाचा संपूर्ण निकाल

SCROLL FOR NEXT