Maharashtra KArnataka dispute Saam TV
मुंबई/पुणे

Border Dispute: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर सर्वात मोठी घडामोड, अमित शाहांसोबत मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक

बैठकीला कर्नाटकचे मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर सर्वात मोठी घडमोड समोर आली आहे. कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागातील वादात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आता मध्यस्थी करणार आहेत. मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावर दिल्लीत लवकरच बैठक पार पडणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला कर्नाटकचे मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

दोन्ही राज्यात सीमावादामुळे अनेक प्रकल्पांना फटका बसला आहे. तर अनेक उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. दोन्ही राज्यातील तणावाचे वातावरण बघता ही बैठक पार पडणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सीमावाद पेटला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील काही गावांवर आपला दावा सांगितल्याने दोन्ही राज्यातील सीमावर्ती भागात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या बेताल वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या काही वाहनांवर कर्नाटकमध्ये हल्ला करण्यात आला. तर कर्नाटकच्या काही वाहनांवर महाराष्ट्रात काळं फासण्यात आलं. यामुळे परिस्थिती आणखीच चिघळली आहे. याच मुद्द्यावर राज्यात विरोधक आक्रमक झाले आहे. त्यामुळे अमित शाह यांच्यासोबत लवकरच होणारी बैठक महत्त्वपूर्ण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राम मंदिर परिसरात सार्वजनिक शौचालयात संशयित केमिकल गळती; दोन तरुणांचा मृत्यू

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यापूर्वी खात्यात येणार ₹2,000? मोठी अपडेट समोर

Latest Mangalsutra Designs: 6-7 ग्रॅममध्ये बनवा सुंदर सोन्याचे मंगळसूत्र, लेटेस्ट 5 डिझाईन्स करवा चौथसाठी बेस्ट

Phlegm : गरम पाण्याच्या वाफेने खरंच छाती-फुफ्फुसांतील कफ बाहेर पडतो का?

Political News : मुंबईतील शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT