Ambernath doctor brutally attacked by husband with mortar; hospitalized after severe head injury. saam tv
मुंबई/पुणे

Badlapur Crime: साताऱ्यानंतर बदलापुरात खळबळ; डॉक्टर महिलेवर प्राणघातक हल्ला

Man Brutally Beaten Radiologist doctor Wife: अंबरनाथमध्ये घरगुती वादातून एका डॉक्टर महिलेला पतीने मारहाण केलीय. रेडिओलॉजिस्ट डॉ. किरण शिंदे यांच्यावर त्यांच्या पतीने जीवघेणा हल्ला केला. डॉक्टर रुग्णालयात दाखल असून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mayuresh Kadav

  • डॉक्टर किरण शिंदे यांच्यावर प्राणघातक हल्ला

  • नवऱ्यानेच केला डोक्यावर खलबत्त्यानं मारहाण

  • बदलापूरच्या खासगी रुग्णालयात डॉक्टर किरण शिंदे यांना दाखल करण्यात आले आहे.

सातारा डॉक्टर मृत्यू प्रकरण ताजे असतनाच बदलापुरात डॉक्टरवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडलीय. बदलापूरमधील अंबरनाथच्या प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉक्टर किरण शिंदे यांच्यावर त्यांच्या पतीने प्राणघातक हल्ला केला. डोक्यावर खलबत्त्यानं मारहाण केली. याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलीये. किरण शिंदे यांना बदलापूरच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

डॉक्टर किरण शिंदे या अंबरनाथ पश्चिमेच्या मोहन सबर्बिया गृह संकुलात आपले पती आणि दोन मुलांसह वास्तव्याला आहेत. बुधवारी सकाळी त्या गाण्याचा रियाज करण्यासाठी उठल्या. पती विश्वंभर शिंदे यांचा चहा करण्यासाठी किचनमध्ये गेल्या. मात्र त्याचवेळी विश्वंभर शिंदे यांनी त्यांच्यात सुरू असलेल्या कौटुंबिक वादातून किचनमध्ये येऊन किरण शिंदे यांचा गळा पकडत त्यांच्या डोक्यात खलबत्त्याने मारहाण केली.

यावेळी किरण यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांच्या मुलांनी किचनमध्ये धाव घेत आईची सुटका केली. त्यांना बदलापूरच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पोलिसांनी डॉक्टर किरण शिंदे यांचा जबाब नोंदवलाय. सध्या अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या मारहाणीत माझा जीवही जाऊ शकला असता त्यामुळे माझ्या पतीविरोधात माझी तक्रार असून त्याच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक करावी, अशी मागणी जखमी डॉक्टर किरण शिंदे यांनी केली आहे.

सकाळी ४ वाजण्याच्या सुमारास मी गाण्याचा रियाज करण्यासाठी उठले होते. त्यावेळी नवऱ्याला चहाची विचारणा केली. त्याला चहा दिला, पण त्यानंतर आमच्यात वाद झाला. त्यातून मारहाण केली. दोन दिवसापूर्वी आम्ही माथेरानला गेलो होतो. त्यावेळी काढलेल्या एका फोटोचा व्हॉट्सअॅपवर डीपी ठेवला. त्यावर माझ्या एका मित्राने कमेंट केली. त्याच्या रागातून त्याने माझ्या डोक्यावर खलबत्ता मारला. डोक्यातून रक्त वाहून लागल्यानंतर तो शुद्धीवर आला,त्यानंतर त्याने आणि मुलीने रुग्णालयात दाखल केलं, अशी माहिती डॉक्टर महिलेने दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT