Ambernath News  Saam Tv
मुंबई/पुणे

Ambernath News: बारावीच्या परीक्षेला डमी उमेदवार बसवला; अंबरनाथमधील राजकीय नेत्याचा प्रताप

HSC Exam: अंबरनाथमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरबाज अस्लम कुरेशीचा प्रताप उघड झालाय. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता बारावीच्या परीक्षा घेतल्या जात आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अजय दुधाणे, साम प्रतिनिधी

राज्यात बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. सरकारने कॉपीमुक्त अभियान सुरू केलं परंतु सरकारच्या अभियानाचा फज्जा पहिल्याच दिवशी उडाला. सरकारच्या कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडवण्यात राजकारणी देखील मागे नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यानेच या अभियानाला गालबोट लावलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरनाथ येथील शहराध्यक्षाने बारावीच्या परीक्षेसाठी डमी विद्यार्थ्याला बसवल्याची घटना घडलीय. याप्रकरणी डमी उमेदवाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विद्यार्थी काँग्रेसच्या अंबरनाथ शहराध्यक्षाने बारावीच्या परीक्षेला स्वतःच्या जागी डमी परीक्षार्थी बसवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. अरबाज अस्लम कुरेशी असं या शहराध्यक्षाचं नाव आहे. त्यांनी असून त्यांचा डमी म्हणून अहमद खान नावाच्या व्यक्तीला परीक्षा देण्यासाठी बसवलं होतं. हा प्रकार समजल्यानंतर पोलिसांनी डमी परीक्षार्थ्याला बेड्या ठोकल्या आहेत.

अरबाज अस्लम कुरेशी याने पालघर जिल्ह्यातील एसपी कॉलेजमधून बारावीचा फॉर्म भरला होता. वसईच्या सातीवली तुंगारफाटा भागातील ओम साई इंग्लिश हायस्कुलमध्ये त्यांचं परीक्षा केंद्र होतं. सोमवारी फिजिक्सच्या पेपरला त्यांनी स्वतः ऐवजी अहमद खान याला पेपर सोडवण्यासाठी बसवलं होतं. याची माहिती मिळताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी या केंद्रावर जाऊन पोलीस आणि केंद्रप्रमुखांना याबाबतची माहिती दिली.

त्यानुसार तपासणी करण्यात आली. तपासणी केल्यानंतर हा गजब प्रकार समोर आला. परीक्षा देण्यासाठी अरबाज कुरेशी बसले नसून अहमद खान नावाचा व्यक्ती परीक्षा केंद्रात बसल्याची बाब समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आलीय. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पेल्हार पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल करत अहमद खान याला बेड्या ठोकण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र या प्रकारामुळे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा शहराध्यक्षच जर हे धंदे करत असेल, तर हे कृत्य पक्षाला आणि त्याच्या पदाला शोभनीय आहे का? अशी चर्चा सध्या अंबरनाथमध्ये सुरू आहे.

बारावीच्या परीक्षेत ७४ कॉपी बहादर सापडले

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता बारावीच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. सरकारने कॉपी मुक्त अभियान सुरू केलं आहे, मात्र कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याचे दिसून येत नाहीये. सोमवारी भौतिकशास्त्र व तर्कशास्त्र विषयाच्या पेपरच्या वेळी एकूण ७४ विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडण्यात आले. छत्रपती संभाजी नगर विभागांमध्ये प्रत्येक पेपरला सर्वाधिक कॉपी प्रकरणी आढळून येत आहे. ५७ विद्यार्थी छत्रपती संभाजी नगर विभागात आढळून आलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

KOLHAPUR GOKUL MORCHA: दूध उत्पादकांचा डिबेंचरसाठी गोकूळ दुध संघाविरोधात मोर्चा; पण डिबेंचर म्हणजे नेमकं काय?

SCROLL FOR NEXT