Mumbai Crime  Saam Tv
मुंबई/पुणे

Ambernath News : पत्नी नेमकी कुणाची? पहिल्या पतीचा सोडून गेलेल्या पत्नीवर हल्ला, दुसऱ्या पतीवरही कोयत्याने वार

Ambernath Crime News : अंबरनाथमध्ये पत्नी कोणाची हा वाद शिगेला गेला. या वादात पहिल्या पतीने सोडून गेलेल्या पत्नीवर आणि तिच्या नवऱ्यावर कोयत्याने हल्ला केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अंबरनाथमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंबरनाथमध्ये पत्नी कोणाची ? या वादातून पहिल्या पतीने आपल्या सोडून गेलेल्या पत्नीसह तिच्या दुसऱ्या पतीवर कोयत्याने वार केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. यामध्ये हे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मुंबईच्या फोर्टीस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना अंबरनाथ येथील गजबजलेल्या शिवमंदीर रोडवर घडली. या घटनेनंतर आरोपी स्वतः पोलिसांना शरण आला आहे.

अंबरनाथ पश्चिमेला राहणारे वैशाली पितळे आणि तिचे पती महेश पितळे हे शुक्रवारी २७ जून रोजी रात्री अंबरनाथ पूर्वेच्या शिवमंदिर रोडवरील एका ज्वेलर्समध्ये दागिने खरेदी करण्यासाठी आले होते. यावेळी वैशालीचा पहिला पती लाभेश प्रभाकर म्हात्रे हा रिक्षा घेऊन तिथे आला आणि त्याने वैशालीवर धारदार कोयत्याने हल्ला चढवला. यात वैशालीच्या दोन्ही हातावर आणि गुडघ्यावर वार करून लाभेशने तिला गंभीर जखमी केलं. यावेळी वैशालीला वाचवण्यासाठी तिचा दुसरा पती महेश पितळे हा मध्ये पडला असता त्याच्याही हातावर लाभेश म्हात्रेने कोयताने वार केले.

या हल्ल्यात जखमी झालेल्या वैशाली आणि महेश यांनी सुरुवातीला जवळच्या शोभा हॉस्पिटल आणि तिथून संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी धाव घेतली. मात्र तिथे प्राथमिक उपचार करून त्यांना मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. दरम्यान, या घटनेनंतर आरोपी लाभेश मात्रे हा स्वतःहून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना शरण आला. याप्रकरणी त्याच्या विरोधात गंभीर हत्याराने दुखापत करणे, यासह भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai : अलिबाग, गोव्यापेक्षाही सुंदर आहे नवी मुंबईतील 'हा' समुद्रकिनारा

T20 World Cup 2026 Schedule : टी २० वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर; या दिवशी होणार क्रिकेटच्या महाकुंभमेळ्याला सुरुवात, रोहित शर्माकडं मोठी जबाबदारी

Green Chili Pickle: गावरान पद्धतीने बनवा हिरव्या मिरचीचं लोणचं, वर्षानुवर्षे टिकून राहील चव

Maharashtra Live News Update : महात्मा फुलेवाडा आमच्या ताब्यात द्या; राज्य सरकारला समता परिषदेचे पत्र

Shocking : लग्नाला सुट्टी मिळाली नाही; लग्नाच्या एक दिवसाआधी ऑडिटरने आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT