pune news saam tv
मुंबई/पुणे

'पीएफआय'च्या कार्यकर्त्यांनी 'त्या' घोषणा दिल्याच नव्हत्या; समोर आली नवीन माहिती

पुण्यातील 'पीएफआय'च्या कार्यकर्त्यांच्या आंदोलनात 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा देण्यात आल्या नव्हत्या, असा दावा 'अल्ट न्यूज' या फॅक्ट चेक करणाऱ्या न्यूज पोर्टलने केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

Pune News : पुण्यातील (Pune) 'पीएफआय'च्या कार्यकर्त्यांच्या आंदोलनात 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा देण्यात आल्या नव्हत्या, असा दावा 'अल्ट न्यूज' या फॅक्ट चेक करणाऱ्या न्यूज पोर्टलने केला आहे. अल्ट न्यूजने 'पीएफआय'च्या कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजी करतानाचा व्हिडिओ हा इतर कॅमेरांमध्ये शूट झालेल्या व्हिडिओसोबत (Video) पडताळून पाहिला. त्यानंतर सदर माहिती 'अल्ट न्यूज'च्या हाती लागली आहे.

फॅक्ट चेक करणाऱ्या अल्ट न्यूजने पुण्यातील 'पीएफआय'च्या कार्यकर्त्यांच्या आंदोलनाच्या व्हिडिओमध्ये 'पाकिस्तान जिंदाबाद' अशा घोषणा देण्यात आल्याचा दावा करण्यात आलेला व्हिडिओ पडताळून पाहिला. तसेच आंदोलनावेळी इतर कॅमेरांमध्ये शूट झालेल्या व्हिडिओ हा काही व्हायरल व्हिडिओसोबत पडताळून पाहिला.

ज्या कॅमेरामध्ये शूट झालेल्या व्हिडिओमध्ये 'पॉपुलर फ्रंट जिंदाबाद' अशा घोषणा देण्यात येत असल्याचं ऐकू येत आहे. मात्र, व्हायरल व्हिडिओमध्ये फक्त 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा ऐकू येत असल्याचे अल्ट न्यूजने म्हटलं आहे.

व्हायरल झालेल्या वादग्रस्त व्हिडिओमध्ये 'पाकिस्तान जिंदाबाद' या घोषणा ऐकू येत आहेत. मात्र, त्याच क्षणाला इतर व्हिडिओमध्ये 'पॉपुलर फ्रंट जिंदाबाद' या घोषणा ऐकू येत आहेत, असेही अल्ट न्यूजने म्हटलं आहे. अल्ट न्यूजने पुण्यातील या वादग्रस्त व्हिडिओबाबत अल्ट न्यूजने एक वृत्त देखील त्यांच्या पोर्टलवर प्रकाशित केले आहे.

'पीएफआय' कार्यकर्त्यांवरील देशद्रोहाचा गुन्हा केला रद्द

देश विघातक कृत्य केल्याच्या संशयावरून केंद्रीय तपास यंत्रणेने पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या कार्यालयांवर धाडसत्र राबविले. याच पीएफआय कार्यकर्त्यांनी 'पाकिस्तान जिंदाबाद' अशा घोषणा केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. त्यानंतर याच 'पीएफआय'च्या कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात दिली.

फडणवीसांनी सदर माहिती दिल्याच्या अवघ्या काही तासानंतर पुणे पोलिसांनी 'पीएफआय'च्या कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले राजद्रोहाचे गुन्हे रदद् करण्यात आले आहे. राजद्रोहाचा गुन्हा रद्द केल्याची माहिती पुणे शहरातील बंड गार्डन पोलिसांनी दिली.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT