Pune News : पुणे पोलीस संभ्रमात; 'पीएफआय' कार्यकर्त्यांवरील देशद्रोहाचा गुन्हा केला रद्द

पुणे पोलिसांनी 'पीएफआय'च्या दाखल केलेला देशद्रोहाचा गुन्हा रद्द केला आहे.
pune news
pune news saam tv
Published On

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

Pune Crime news : पुणे पोलिसांनी 'पीएफआय'च्या कार्यकर्त्यांवर पाकिस्तान घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. देशद्रोहाचा गुन्हा केल्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माहिती दिली होती. त्यानंतर अवघ्या काही तासातच पुणे पोलिसांनी (Police) 'पीएफआय'च्या कार्यकर्त्यांवर दाखल केलेला देशद्रोहाचा गुन्हा रद्द केला आहे. (Pune News In marathi)

pune news
दीपक केसरकरांनी दिला आदित्य ठाकरेंना सल्ला; म्हणाले,' उद्धव ठाकरे यांच्याकडून...'

देश विघातक कृत्य केल्याच्या संशयावरून केंद्रीय तपास यंत्रणेने पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या कार्यालयांवर धाडसत्र राबविले. याच पीएफआय कार्यकर्त्यांनी 'पाकिस्तान जिंदाबाद' अशा घोषणा केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. त्यानंतर याच 'पीएफआय'च्या कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात दिली.

फडणवीसांनी सदर माहिती दिल्याच्या अवघ्या काही तासानंतर पुणे पोलिसांनी 'पीएफआय'च्या कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले राजद्रोहाचे गुन्हे रदद् करण्यात आले आहे. राजद्रोहाचा गुन्हा रद्द केल्याची माहिती पुणे शहरातील बंड गार्डन पोलिसांनी दिली.

pune news
Pune : पाकिस्तान जिंदाबाद बोलणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा; देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती

दरम्यान, 'पीएफआय'च्या कार्यकर्त्यांवरील राजद्रोहाचा गुन्हा रद्द करण्यावरून पुणे पोलीस संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला असल्याचं स्पष्ट केलं होतं.

मात्र, पुणे शहरातील बंड गार्डन पोलीस ठाण्यातील पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांवरील देशद्रोहाचं कलम सदर गुन्ह्यातून हटवल्याची माहिती दिली. सुप्रीम कोर्टाची ऑर्डर असल्यामुळे ते कलम लागत नाही, त्यामुळे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पुणे पोलिसांकडून देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com