Tejashwi Yadav on Maharashtra Government Saam Tv
मुंबई/पुणे

Tejashwi Yadav: महाराष्ट्र सरकारमधील सर्व नेते हे लीडर नाही, डीलर; तेजस्वी यादव यांचा हल्लाबोल

India Alliance Rally in Mumbai: ''महाराष्ट्र सरकारमधील सर्व नेते हे लीडर नाही, डीलर आहेत. हे फक्त डीलिंग करत आहेत. जे लोक गेले, ते बरं झालं गेले'', असं बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव म्हणाले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

>> रुपाली बडवे

Tejashwi Yadav On BJP:

''महाराष्ट्र सरकारमधील सर्व नेते हे लीडर नाही, डीलर आहेत. हे फक्त डीलिंग करत आहेत. जे लोक गेले, ते बरं झालं गेले'', असं बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव म्हणाले आहेत. शिवाजी पार्कमधील भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप सभेत ते असं म्हणाले आहेत.

ते म्हणाले की, ''आज मुंबईत भारत जोडो यात्रेचा शेवटचा दिवस आहे. आज एकाबाजून द्वेश पसरवला जात आहे. ईडी सीबीआयच्या माध्यमातून पक्षांवर दबाव टाकला जात आहे लोकशाहीला धोका निर्माण झालाय. दुसरीकडे लोकांमध्ये प्रेम वाटण्यासाठी राहुल गांधी यात्रा काढत आहेत. देशाला वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलोय. मोदींना हरवण्यासाठी नाही, तर देश तोडणाऱ्या विचारधारेच्या विरोधात आम्ही लढत आहेत.''  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तेजस्वी यादव म्हणाले, ''या लोकांनी बिहारमध्ये आमच्या काकांना हायजॅक केले आहे. महाराष्ट्रात आमदारांना घेऊन गेले. बिहारमध्ये काकांनी बाजू बदलली. असं असलं तरी जनता आमच्यासोबत आहे. निवडणुकीत धक्कादायक निकाल येईल. देशात द्वेष पसरवला जात आहे. देशातील घटनात्मक संस्थांचे अपहरण केले जात आहे. निवडून आलेले सरकार विकत घेतले जात आहे. ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून धमक्या देऊन सरकारे पडली जात आहेत.'' (Latest Marathi News)

ते पुढे म्हणाले, ''बिहारमध्ये आम्ही ५ लाख लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत. गेल्या १० वर्षांत किती नोकऱ्या दिल्या, हे केंद्र सरकारने जनतेला सांगावे.''

तेजस्वी यादव यांच्या आधी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनीही सभेला संबोधित केले. ते म्हणाले, ''आपल्याला भारताला वाचवायचे आहे. मग ते हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो... काहीही असो. ते भारतीय आहेत.'' ते म्हणाले, ''स्वातंत्र्य लढ्यासाठी या जमिनीत (महाराष्ट्र) अनेक नेते तयार झाले. कन्याकुमारीपासून आलेली यात्रा काश्मिरमध्ये आणि आता मणिपूरपासून मुंबईत आली. ''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: शरद पवार गटाला मोठा धक्का! गडचिरोलीत बाबा आत्रम यांचा विजय

Health Diet: तुमच्या रोजच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असणे महत्वाचे आहे? जाणून घ्या फायदे

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

Nanded News : लोहामध्ये मतमोजणी केंद्राबाहेर दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त वाढविला

Maharashtra Election Result: महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

SCROLL FOR NEXT