Devotees gather at Alandi’s Sant Dnyaneshwar Temple amid outrage over alleged donation box theft by a temple sevak. saam tv
मुंबई/पुणे

आळंदीत सेवेकऱ्याची कारस्थाने उघड? खात्यात १० लाखांची उलाढाल, मंदिर प्रशासनात खळबळ

₹10 Lakh Transactions Raise Suspicion in Alandi Temple: आळंदीतील संत ज्ञानेश्वर मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणात नवीन खुलासे समोर आले आहेत. संशयित सेवेकऱ्याच्या खात्यात १० लाखांची उलाढाल उघड झाल्याने वारकरी महामंडळाने सखोल चौकशीची मागणी केली आहे.

Omkar Sonawane

गोपाल मोटघरे, साम टीव्ही

पुणे: आळंदीतील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरातील दानपेटीतून पैसे लंपास करणाऱ्या सेवेकऱ्याविरोधात आता राज्य वारकरी महामंडळाचे उपाध्यक्ष कमालीचे आक्रमक झाले आहेत. हे संपूर्ण प्रकरण अत्यंत गंभीर आणि मोठे असल्याचा आरोप त्यांनी केला असून, चोरी करणाऱ्या या सेवेकऱ्याच्या पाठीमागे नक्कीच कोणाचा तरी वरदहस्त असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

विशेष म्हणजे, संबंधित संशयित सेवेकऱ्याच्या बँक खात्यात तब्बल १० लाख रुपयांची मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचे उघडकीस आले असून, यामुळे या चोरीच्या व्याप्तीबाबत संशय अधिक बळावला आहे. या पार्श्वभूमीवर, अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या मुख्य मंदिरात या सेवेकऱ्याला प्रवेश कोणी दिला आणि या गुन्ह्यात त्याला मंदिरातील किंवा बाहेरील कोणी सहकार्य केले, याचा सखोल तपास लावण्यात यावा, अशी आग्रही मागणी वारकरी महामंडळाच्या उपाध्यक्षांनी केली आहे. या घटनेमुळे भाविक आणि वारकरी संप्रदायात तीव्र संतापाचे वातावरण आहे.

'त्या' सेवेकऱ्याला कोणाचा वरदहस्त?

वारकरी महामंडळाच्या उपाध्यक्षांनी या चोरीच्या तीव्र शब्दांत निषेध करत गंभीर आरोप केले आहेत. हे संपूर्ण प्रकरण अत्यंत गंभीर आणि मोठे आहे. दानपेटीवर डल्ला मारणाऱ्या या सेवेकऱ्याच्या पाठीमागे नक्कीच कोणाचा तरी मोठा वरदहस्त आहे, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. या मागे मोठे रॅकेट असण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

भाविक आणि वारकरी संप्रदायात तीव्र संताप

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या माऊलींच्या दरबारात असा प्रकार घडल्याने संपूर्ण वारकरी संप्रदायात आणि माऊली भक्तांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. देवाच्या चरणी अर्पण केलेल्या दानाची अशा प्रकारे चोरी करणाऱ्या दोषींवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT