Alandi Hit and run Case  Saam tv
मुंबई/पुणे

Alandi : पुणे पोर्शे अपघाताची आळंदीत पुनरावृत्ती? कार चालकाकडून नागरिकांना चिरडण्याचा प्रयत्न, घटनास्थळी नेमकं काय घडलं?

रोहिदास गाडगे

पुणे : पुणे पोर्शे अपघातानंतर आळंदीतही पुनरावृत्ती समोर आली आहे. आळंदीजवळ अल्पवयीन कार चालकाकडून महिलेसह नागरिकांना चिरडण्याचा प्रयत्न झाला आहे. या अपघातावेळी महिलांनी एकच आरडाओरड केली. नागरिकांना चिरडण्याचा प्रयत्न कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

पुण्यातील कल्याणीनगर भागात हिट अँड रनचा प्रकार आळंदीतही झाल्याचे समोर आले आहे. आळंदी जवळील वडगाव घेणंद येथील अल्पवयीन कार चालकाने महिलेसह नागरिकांना चिरडण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. या अल्पवयीन कार चालकाने जमावाला चिरडण्यासाठी कार पाठीमागे घेऊन जात पूर्ण वेगाने चालवत चिरडण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा थरार कॅमेरात कैद झाला आहे.

आळंदीतील अंगावर काटा आणणारा हा थरार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अपघाताच्या थरारानंतर हा तरुण कारच्या छतावर बसून शिवीगाळ करत होता. पूर्ववैमनस्यातून अल्पयवीन तरुणाने महिलेसह नागरिकांना चिरडण्याचा प्रकार केल्याबाबत आळंदी पोलिसांत फिर्याद देण्यात आली आहे. या प्रकरणी नाजूका यांच्या फिर्यादीवरून आळंदी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

व्हिडिओमध्ये काय दिसत आहे?

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, अल्पवयीन चालक कार वेगाने चालवण्यासाठी मागे नेली. त्यानंतर भरधाव कार थेट नागरिकांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. तसेच या चालकाने एका महिलेच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला.

घटनास्थळी भडकलेल्या नागरिकांनी कार चालकाला मारण्याचा प्रयत्न केला. तसेच महिला आणि पुरुषांनी कार चालकाला शिवीगाळ करत जाब विचारला. मात्र, अल्पवयीन कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

अल्पवयीन कार चालकला अटक

दरम्यान, या प्रकरणी अल्पवयीन कार चालकाला आळंदी पोलिसांनी अटक केली आहे. महिलेसह नागरिकांना जीवे मारण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी अल्पवयीन कार चालक तरुणाला अटक केली आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप अल्पवयीन मुलाला कार चालवायला देणाऱ्या पालकांवर करवाई केली नसल्याची माहिती समोर आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video News : पुराच्या पाण्यात बैलगाडी टाकणं अंगलट; शेतकऱ्यासह ५ जण बुडाले; धडकी भरवणारा VIDEO व्हायरल

Bigg Boss Marathi: "बिग बॉसची पहिली बायको.." राखी सांवतची बिग बॉसच्या घरात एन्ट्री होताच निक्कीची बोलती बंद

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत कोणाला मिळणार १५०० रुपये अन् कोणाला ४५००? जाणून घ्या

Maharashtra Politics: राज्याचे मुख्यमंत्रीपद फिरते असावे?, अजित पवारांची अमित शहांकडे मागणी

Best Movies In India: पाथेर पांचाली, मसान ते सैराट... भाषांची मर्यादा तोडून हिट झालेले १० चित्रपट!

SCROLL FOR NEXT