पुण्यात दिवसेंदिवस कोयता गँगची दहशत वाढू लागली आहे. यामुळे पुण्यातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या कोयता गँगचं पुण्यापासून ते पिंपरी-चिंचवडपर्यंत लोण पसरलं आहे. या कोयता गँगची नागरिकांमध्ये मोठी दहशत आहे. या कोयता गँगमुळे पुण्यात गुन्हेगारी वाढली आहे का, असा प्रश्न लोकांकडून केला जात आहे. याचदरम्यान, या कोयता गँगचा सुपडा साफ करणार, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. ते पुण्यातील एका सभेत बोलत होते. (Latest Marathi News)
उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यात होते. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा झाला. या कार्यक्रमात अजित पवारांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी पुण्याच्या विविध समस्या अधोरेखित करत लवकरच उपाययोजना करणार असल्याचे आश्वासन दिले.
१. विरोधकांना आता मुद्दा राहिलेला नाही. ते म्हणतात सगळं गुजरातमध्ये चाललं आहे.
जे महाराष्ट्राचे आहे, ते महाराष्ट्राचं राहणार आहे. काही राज्यकर्ते चुकीचे निर्णय घेतात. तुमची सहनशीलता संपलेली आहे.
विक्रम कुमार काम जोरात करा. कुठे काम आलं की झाडं तोडू नका, असा आदेश येतो.
२. आम्ही मंत्रालयात बसून सगळे प्रश्न मार्गी लावायचे काम करतो. सगळे आमदार या गोष्टींचा पाठपुरावा करत आहेत.
राज्यातील विकासकामांचे प्रकल्प पूर्ण करणार. पुण्यात ११७५ कोटी रुपयांचे आज भूमिपूजन झालं आहे. दर्जेदार आणि गुणवत्ता पूर्ण आणि सौंदर्यपूर्ण काम झालं पाहिजे.
३. पुणेकरांना सुविधा देण्यासाठी महायुतीचे सरकार कटीबद्ध आहे.
४. कसली कोयता गँग रे? कोयता गँगचा सुपडा साफ करणार आहे. या गोष्टी अजिबात खपवून घेणार नाही. ते पोरगं किती ही मोठ्या बापाचे असले तरी सुद्धा आता काही चालणार नाही.
५. काही लोकं म्हणतात की आता चूक झाली, पदरात घ्या... पदर फाटला आता... पदर नाही, धोतर नाही आता डायरेक्ट टायरमध्ये...
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.