Pune University : पोह्यामध्ये अळी, उपीटमध्ये केस; पुणे विद्यापीठाच्या भोजनगृहातील किळसवाणा प्रकार समोर

Pune University Latest News : विद्यापीठातील विद्यार्थी खात असलेल्या पोह्यांमध्ये अळी आणि उपीटमध्ये केस आढळल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
Pune University mess food
Pune University mess food Saam tv
Published On

अक्षय बडवे, पुणे

Pune University News :

पुणे विद्यापीठातून एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भोजनगृहातील भोजनाचा गुणवत्ता ढासळला आहे का, असा प्रश्न उपस्थित करणारं वृत्त हाती आलं आहे. विद्यापीठातील मेसमध्ये विद्यार्थी खात असलेल्या पोह्यांमध्ये अळी आणि उपीटमध्ये केस आढळल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे विद्यापीठाच्या भोजनगृहातील विद्यार्थ्यांच्या पोह्यामध्ये अळी आणि उपीटमध्ये केस आढळल्याचा किळसवाणा प्रकार समोर आळा आहे. विद्यार्थी भोजन करत असलेल्या मेसमध्ये प्रकार झाला आहे. सकाळी न्याहारीसाठी तयार केलेल्या पोह्यामध्ये अळी आढळून आली तर उपीटमध्ये केस आढळला आहे. या पदार्थांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावरही नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Pune University mess food
Pune university News : BJP News : पुणे विद्यापीठात राडा नेमकं प्रकरण काय?

विद्यापीठाच्या भोजनगृहातील किळसवाण्या प्रकारानंतर विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकारानंतर प्रशासनाने प्राध्यापकांचा सामावेश असलेली उपहारगृह आणि भोजनगृह दक्षता समिती तसेच विद्यार्थ्यांचा सामावेश असलेली भोजनगृह गुणवत्ता नियंत्रण समिती काय करतेय, असा प्रश्न उपस्थित करत आहे. या प्रकारानंतर संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणार का, हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Pune University mess food
Pune Fraud University: धक्कादायक! पुण्यात १० वी पास करणाऱ्या बनावट विद्यापीठाचा पर्दाफाश; ४० ते ६० हजारात देत होते बोगस पदव्या

बेलापुरात सामोशात आढळला मेलेला झुरळ

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतील बेलापूरमध्येही असाच प्रकार उघडकीस आला होता. बेलापूर सीबीडीमधील एका खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानातील सामोशात मेलेला झुरळ आढळल्याचा प्रकार घडला होता. एका पत्रकार तरुणीने हा प्रकार उघडकीस आणला होता. सामोशात मेलेला झुरळ आढळल्यानंतर या तरुणीने दुकानात जाऊन संताप व्यक्त केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com