Ajit Pawar Vs Yugendra Pawar Saam Tv
मुंबई/पुणे

Baramati Rada : मोठी बातमी! बारामतीमध्ये जोरदार राडा, अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याची धमकी, युगेंद्र पवारांच्या आईंचा आरोप

Ajit Pawar vs yugendra Pawar, Baramati Rada : युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी अजित पवार गटावर गंभीर आरोप केलाय. या आरोपानंतर अजित पवार स्वत: मतदान केंद्रावर पोहचले.

Namdeo Kumbhar

Ajit Pawar vs yugendra Pawar baramati vidhan sabha election : बारामतीमध्ये मतदान केंद्रावर जोरदार राडा झाल्याचं समोर आलेय. शरद पवार गटाचे उमदेवार युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी अजित पवार गटावर मोठा आरोप केलाय. अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून दमदाटी आणि ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप शर्मिला पवार यांनी केला आहे.

शर्मिला पवार मतदान करण्यासाठी बारामती येथील मतदारसंघात गेल्या होत्या, त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार गटावर हा आरोप केलाय. अजित पवार गटाकडून हा आरोप फेटाळून लावण्यात आला आहे. शर्मिला पवार यांच्या आरोपानंतर अजित पवार मतदान केंद्रावर दाखल होत सद्यस्थितीचा आढावा घेतला.

शर्मिला पवार यांचा गंभीर आरोप -

बारामतीत अजित पवार गटाकडून युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांना दमदाटी केल्याचा आरोप शर्मिला पवार यांनी केला आहे. निवडणूक आयोगाकडे व पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे शर्मिला पवार यांनी म्हटलं आहे.

बारामतीत विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पडत आहे. बारामतीमध्ये महात्मा गांधी बालक मंदिर बूथमध्ये अजित पवार गटाकडून युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांना दमदाटी केली जात आहे, असा आरोप युगेंद्र पवारांच्या आई शर्मिला पवार यांनी केला आहे.

बारामती शहरातील बालक मंदिर शाळेतील मतदान केंद्रामध्ये घड्याळाचा शिक्का मारून मतदारांना पावत्या दिल्या असल्याचे शर्मिला पवार म्हणाल्या. त्याचबरोबर पोलिंग एजंट असलेल्या कार्यकर्त्यांना देखील दमदाटी केली जात असल्याचा आरोप शर्मिला पवार यांनी केला आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार करणार असल्याची माहिती शर्मिला पवार यांनी दिली.

बारामतीमध्ये अजित पवार आणि युगेंद्र पवार असे काका-पुतणे आमनेसामने आहेत. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच या लढतीकडे राज्याचे लक्ष लागलेय. बारमतीमध्ये दोन्ही पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सकाळपासून बारामतीमध्ये सुरळीत मतदान सुरु असल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण अचानाक बारामतीमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांवर गंभीर अरोप केले. दमदाटी केली जात असल्याचा आरोप कऱण्यात आला. बारामतीमधील राजकीय वातावरण सध्या तापलं आहे. मिळालेल्या महितीनुसार, अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून पोलिसांशी बाचाबाची झाली आहे.

अजित पवार गटाकडून आरोप फेटाळले -

योगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आणि खोटे आहेत, अशी प्रतिक्रिया अजित पवार गटाचे किरण गुजर यांनी दिली आहे. घड्याळ चिन्ह असलेल्या चिठ्ठ्या त्या स्वतः घेऊन आल्या होत्या. त्यांच्याकडूनच आमच्या कार्यकर्त्यांना दमदाटी केली जात आहे. बारामतीची ही संस्कृती नव्हती, मात्र बारामतीचं वातावरण बिघडवण्याचे काम या लोकांकडून केलं जात आहे. पराभव डोळ्यांसमोर स्पष्ट दिसत असल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी जर चिठ्ठ्या दिल्या असतील तर त्यांनी पोलीस तक्रार करावी त्यांच्या सगळ्या तक्रारीला उत्तरे दिली जातील, असे अजित पवार यांच्या पक्षाचे नेते किरण गुजर यांनी साम टीव्हीसोबत बोलताना सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Shoking News : जेवणात मीठ कमी पडल्याने, गर्भवती महिलेला गमवावे लागले प्राण

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT