Maharashtra Voting Rada : कुठे राडा, हाणामारी.. कुठे उमदेवाराच भिडले; राज्यात आतापर्यंत कुठं काय घडलं?

Maharashtra Assembly Election Voting Rada News : २८८ विधानसभा मतदारसंघासाठी राज्यात आज मतदान पार पडत आहे. काही ठिकाणी गोंधळ, राडा अन् हाणामारी झाल्याचं चित्र आहे. राज्यात कुठे काय झालं?
Maharashtra Assembly Election
Maharashtra Assembly Election Voting NewsSaam Tv
Published On

Maharashtra Assembly Election Voting Rada News : राज्यात ११ वाजेपर्यंत फक्त १८ टक्के मतदानाची नोंद झालेली आहे. गडचिरोलीमध्ये सर्वाधिक ३० टक्के तर नांदेडमध्ये सर्वात कमी १३ टक्के मतदान झालेय. आजी-माजी मुख्यमंत्र्यांसह कलाकार अन् खेळाडूंनीही आपला हक्क बजावला. दुपारनंतर राज्यातील मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाल्यापासूनच काही ठिकाणी राडा झाल्याचं पाहिला मिळालं. नाशिकमधील नांदवागमध्ये उमेदवारचं भिडल्याचे चित्रही समो आले. त्याशिवाय संभाजीनगरमध्ये दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचेही समोर आले. लातूरमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्यात आलाय. राज्यात नेमकं कुठं काय घडलं? याबाबत जाणून घेऊय़ात...

सिल्लोडमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी -

छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदानाला गालबोट लागल्याचं समोर आलेय. सिल्लोड तालुक्यातल्या घटांबरी येथे दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचा व्हिडीओ व्हायरल जालाय. मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांना आपल्याकडे बोलवत असल्याच्या कारणावरून वाद झाला. त्यानंतर दोन ग्रुपमध्ये प्रचंड हाणामारी झाली.

मतपत्रिकेचा फोटो व्हायरल, किराणा व्यावसायिकावर गुन्हा

मतदान यंत्रावरील मत पत्रिकेचा फोटो व्हायरल करणाऱ्या वैजापूर तालुक्यातील महालगाव येथील एका किराणा व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदान केंद्रात मोबाईलचा वापर करून व्हिडीओ व फोटो व्हायरल केले जात आहे. वैजापूर तालुक्यात आचारसंहिता भंग प्रकरणात हा पहिलाच गुन्हा नोंदविण्यात आला.

बॅटरी खराब, बुलढाण्यात मतदान थांबवलं -

बुलढाण्यातली खामगाव मतदारसंघातील गेरू माटरगाव व श्रीधर नगर येथील दोन मतदान केंद्रावरील मतदान यंत्राच्या बॅटरी खराब झाल्याने मतदान थांबवण्यात आले. त्यामुळे काही काळ गोंधळ झाला. तासभरापासून मतदान थांबवण्यता आले.

दोन्ही मतदान केंद्रावरील मतदान यंत्राच्या बॅटरी खराब झाल्याने मतदान थांबलेले आहे. अद्यापही दुसरे मतदान यंत्र या ठिकाणी पोहोचलेले नाही.

मतदान एकाला, गेलं दुसऱ्याला इगतपुरीमध्ये जोरदार राडा -

इगतपुरी मतदारसंघातील तळेगाव येथे मोठा गोंधळ झाला. मतदान केलेल्या उमेदवाराला मतदान न जाता दुसऱ्या उमेदवाराला जात असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे मतदान केंद्रावर गोंधळ निर्माण झाला. नागरिकांच्या तक्रारीमुळे काही काळ मतदान थांबवण्यात आले. निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि स्थानिक पोलीस प्रशासन मतदान केंद्रावर दाखल झाले आहेत. नागरिकांच्या तक्रारीनंतर इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील तळेगाव येथे घडलेली घटना चर्चेत, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू झाली आहे.

उमेदवार आमनेसामने, नांदगावमध्ये राडा -

मनमाड नांदगाव रस्त्यावर जोरदार राडा झालाय. सुहास कांदे समीर भुजबळ हे दोन्ही उमेदवार आमनेसामने आले. एकमेंकांना धमकी. आज तुझा मर्डर फिक्स आहे, असे म्हणत सुहास कांदे यांनी समीर भुजबळ यांना मारून टाकण्याची धमकी दिली.

सुहास कांदे यांनी त्यांच्या कॉलेजवर ऊसतोड कामकागार यांना ठेवले डांबून ठेवल्याचा आरोप भुजबळ यांनी केला. त्याशिवाय पैसे वाटत असल्याचाही आरोप करण्यात आला. पोलिसांना देखील अरेरावी केल्याचं समोर आलेय. नाशिकमध्ये या प्रकारामुळे वातावरण तापलेय.

संभाजीनगरमधून धक्कादायक व्हिडीओ, घरातूनच मतदान

तदान केंद्रावर नाही तर घरामध्ये बसूनच मतदान केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. गेल्या दोन दिवसांपासून छत्रपती संभाजी नगर शहरांमध्ये पैसे देऊन मतदान घरीच करून त्यांच्या आधारकार्ड, मतदान कार्ड जमा करत असल्यास वरून गोंधळ उडला होता. त्यात हे व्हिडिओ समोर आल्यामुळे लोकशाहीची थट्टा सुरू आहे का? असा एक प्रश्न उपस्थित होतोय. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत.

सिल्लोडमध्ये मतदानावर बहिष्कार, एकही मतदाराने मतदान केले नाही

सिल्लोड तालुक्यातल्या रामनगर येथील गावकऱ्यांनी बहिष्कार टाकला आहे. रामनगर हे पुनर्वाचित गावठाण असून गावठाण 26 वर्ष झाले. या गावाला स्मशानभूमी नाही दफनभूमी नाही, रेकॉर्डला सगळे सुख सुविधा उपलब्ध आहे. नागरिकांची मागणी आहे नगररचनेप्रमाणे प्लॉट स्मशानभूमी दफनभूमी गावाच्या ताब्यात देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

लातूरमध्ये मतदानावर बहिष्कार.

लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील टेंभुर्णी गावात ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय.. गावातील मागच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या स्मशानभूमीच्या प्रश्नासाठी गावकऱ्यांनी हा निर्णय घेतलाची माहिती मिळत आहे. अनेकदा आंदोलन करू नही आणि निवेदन देऊनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. तर 923 इतकी या गावात मतदार संख्या आहे.

धुळ्यामध्ये मतदान केंद्रावर पैशांचे वाटप

धुळ्यामध्ये मतदान केंद्रावर पैशांचे वाटप करण्यात आल्याचं समोर आले आहे. पैसे वाटणाऱ्या तरुणाला नागरिकांनी चोप दिला असून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेय. मतदानाच्या दिवशीच मतदान केंद्रावर अशापद्धतीने पैशांची वाटप करण्यात आली आहे त्यामुळे खळबळ उडाली आहे. हा तरुण कोणत्या पक्षाच्या वतीने हे पैसे वाटत होते याची माहिती अद्याप समोर आली नाही.

भगव्या टोप्यांवरून कोल्हापुरात तणाव

कोल्हापूरमधील फुलाची शिरोली इथं भगव्या टोप्यांवरून तणाव वाढलय. मतदान करण्यासाठी मतदारांनी भगवी टोपी घातल्याने पोलिसांनी हटकलं. भगव्या टोपीला विरोध केल्याने कार्यकर्त्यांनी गोल टोपी आणि हिजब घालून येणाऱ्या मतदारांना विरोध करण्याची मागणी केली.

शिरोली इथल्या मतदान केंद्रावर मतदारांनी मोठ्या प्रमाणात भगव्या टोप्या घालून प्रशासनाचा निषेध केला. कोणत्याही परिस्थितीत भगवी टोपी घालूनच मतदान करण्याचा मतदारांनी पवित्रा घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com