Ajit Pawar On Sanjay Raut Saam tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar On Sanjay Raut: 'आमच्या पक्षाचे वकीलपत्र घेऊ नका...'; अजित पवारांनी संजय राऊतांना नाव न घेता लगावला टोला

अजित पवार यांनी आमच्या पक्षाचे वकीलपत्र घेऊ नका, म्हणत संजय राऊतांना नाव न घेता टोला लगावला आहे.

Vishal Gangurde

Ajit Pawar News: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपसोबत जात असल्याच्या चर्चा सुरु असताना आता स्वत: त्यांनीच याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच अजित पवार हे भाजपसोबत जाण्याच्या वावड्या असल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. मात्र, अजित पवार यांनी आमच्या पक्षाचे वकीलपत्र घेऊ नका, म्हणत संजय राऊतांना नाव न घेता टोला लगावला आहे. (Latest Marathi News)

अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चेवर भाष्य करताना म्हणाले, 'कारण नसताना माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत. अशा बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही'.

'40 आमदारांच्या सह्या कुणीही घेतल्या नाही. सही घेण्याचं काहीही कारण नाही. या बातम्यांना काहीही आधार नाही. कुणी काय मत व्यक्त करावं हा त्यांचा अधिकार आहे. अनेक आमदार कामानिमित्त येत असतात, असेही अजित पवार म्हणाले.

'आजही नेहमीप्रमाणे आमदार भेटायला आले होते. आमदारांची वेगवेगळी कामं होती, असं अजित पवार यांनी स्पष्ट केले.

'आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहोत. मात्र अशा बातम्यांमुळे आमच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम तयार होतो. अशा बातम्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. राज्यातील महत्वाच्या प्रश्नावरुन लक्ष हटवण्यासाठी अशा अफवा पसरवल्या जात आहेत, असा आरोप अजित पवार यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: गडचिरोली जिल्ह्यातील 100 गावाचा संपर्क तुटला

Mumbai Rain : मुंबईत पावसाचा हाहाकार, अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी, लोकल ३० मिनिटे उशिराने

कोकणात भाजपची ताकद वाढली; सावंतवाडीत केसकरांच्या विरोधात ठोकला होता शड्डू, शिवसेनेला धक्का

Income Tax Return: इन्कम टॅक्स रिटर्न स्टेट्स कसं चेक करायचं? स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

Ride Accident Viral Video: 50 फूटावरून राईड कोसळली; सोमनाथ मंदिराच्या यात्रेत मोठा अपघात; Video व्हायरल

SCROLL FOR NEXT