Ajit Pawar Saam Tv
मुंबई/पुणे

अजित पवार म्हणतात मी तिजोरी उघडली नाही तर त्यांना काय मिळणार... (पहा व्हिडिओ)

अजित पवारांची पुन्हा जीभ घसरली, भरणेंमामांना मिश्कीलपणे आपल्या पदाची आठवण करुन दिली.

मंगेश कचरे

बारामती - पुरंदर तालुक्यातील एक कार्यक्रमात अजित पवार यांनी भरणेंमामांना मिश्कीलपणे आपल्या पदाची आठवण करुन दिली. पुरंदर (Purandar) तालुक्यातील निंबूत येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या समता पॅलेस या वातानुकूलित नुतन वास्तूच्या उद्घाटन समारंभात अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी जोरदार फटकेबाजी केली.

दत्ता मामा सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री आहेत. त्यांनी जिल्ह्यासाठी चांगला निधी आणलाय आहे. त्यांना आम्ही विनंती करत असतो की आमच्या तालुक्याला पण निधी द्या. तुम्ही फक्त इंदापूर तालुक्याचे राज्यमंत्री नाही आहात. बांधकाम विभागाच्या चाव्या त्यांच्या हातात आहेत, परंतु त्यांना कुठं माहिती आहे की तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आहेत. मी तिजोरी उघडली नाही तर त्यांना काय मिळणार...असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्घाटन समारंभात जोरदार फटकेबाजी केली. यामुळे उपस्थितांमध्ये हास्यांचे फवारे उडाले.तसंच, अजित पवार यांना आपल्या विधानामुळे वाद होऊ शकतो हे लक्षात आल्यावर आता गाडी घसरायला लागली आहे आता थांबतो अस म्हणत सावरून घेतलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भीमाशंकरची महादेव नगरी सजली, भाविक शिवभक्तीत तल्लीन

श्रावण सोमवारी पहाटे दुर्घटना, मंदिरात विजेची तार तुटल्याने चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू, 38 भाविक जखमी

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

SCROLL FOR NEXT