ajit pawar  Saam tv
मुंबई/पुणे

Malegaon Sugar Factory Election result : 'माळेगावचे दादा' अजित पवारच; उपमुख्यमंत्र्यांनी काढला पराभवाचा वचपा, वाचा स्पेशल रिपोर्ट

Malegaon Sugar Factory Election result update : रंजन तावरेंचा अजित पवारांकडून सुफडासाफ करण्यात आलाय... त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन होण्याचा मार्ग मोकळा झालाय....तब्बल 21 पैकी 20 जागांवर अजित पवारांच्या पॅनलने विजय मिळवलाय.. मात्र माळेगाव सहकारी साखर कारखाना अजित पवारांसाठी महत्वाचा का आहे? पाहूयात...

Bharat Mohalkar

बारामतीचं सत्ताकेंद्र असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मैदानात चौरंगी लढतीत अजित पवारांनी भाजपचे रंजन तावरे आणि पवारांच्या राष्ट्रवादीचा धुव्वा उडवलाय.. तर स्वतः अजित पवारही विजयी झालेत.. त्यामुळे कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलाय..

दुसरीकडे माळेगावच्या मैदानात अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनलने विजय मिळवला असला तरी त्यामागे पैशाचं गणित असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय.

लोकसभेत सुनेत्रा पवारांचा पराभव झाला.. त्यामुळे बारामती राखण्यासाठी अजित पवारांनी कंबर कसली.. त्याचाच फायदा विधानसभा निवडणुकीत झाला.. तर विधानसभेनंतर बारामतीची तटबंदी मजबूत कऱण्यासाठी आधी इंदापूरचा छत्रपती कारखाना आणि आता माळेगाव कारखान्यावर अजित पवारांनी वर्चस्व मिळवलंय... तर यासाठी पवारांच्या पॅनलचीही मदत झाल्याचं अप्रत्यक्षरित्या अजित पवारांनी कबूल केलंय.

माळेगाव सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत 19 हजार 549 सभासदांनी मतदान केलं.. मात्र या निवडणुकीत अजित पवारांच्या पॅनलने जोरदार मुसंडी मारलीय.. माळेगाव सहकारी कारखाना अजित पवारांसाठी महत्वाचा का आहे? पाहूयात...

41 वर्षानंतर अजित पवार कारखान्याच्या निवडणुकीत

माळेगाव हे बारामतीचं सत्ताकेंद्र अशी वदंता

माळेगाव कारखान्याचे 20 हजार सभासद

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्चस्व राखण्यासाठी माळेगाव कारखान्याचा फायदा

2015 मधील तावरेंकडून झालेल्या पराभवाचा वचपा काढला

माळेगाव सहकारी कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारात अजित पवारांनी चेअरमनपदाची इच्छा व्यक्त केली होती.. त्यामुळे आता बारामतीवर वर्चस्व राखण्यासाठी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पवार आणि तावरेंना रोखण्यासाठी अजित पवार चेअरमनपद स्वीकारणार का? यावर बारामतीचं समीकरण अवलंबून असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train: वंदे भारत स्लीपर, अमृत भारत; २०२६ मध्ये लॉन्च होतील नवीन ट्रेन; असतील हजारो खास फीचर्स

Pune Accident : पुण्यात पुन्हा भीषण अपघात; महामार्गावर ४ वाहनांची एकमेकांना धडक

Maharashtra Live News Update: हसन मुश्रीफ यांची पुन्हा शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यावर टीका

उज्ज्वला थिटेंना धक्का, अनगरचा नगराध्यक्ष ठरला; जिल्हा न्यायालयानं नेमका निकाल काय दिला? VIDEO

India Tourism : काश्मीर-मनाली नाही; गुलाबी थंडीत आवर्जून फिरा 'हे' ठिकाण, जोडीदार होईल खुश

SCROLL FOR NEXT