Ajit Pawar News
Ajit Pawar News saam tv
मुंबई/पुणे

Sharad Pawar Retirement: 'राजीनाम्याचं आधीच ठरलं होतं, कालच घोषणा करणार होते; पण...; अजित पवारांचा मोठा खुलासा

Priya More

Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा मोठा निर्णय जाहीर केला. त्यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. शरद पवार हे असा काही निर्णय घेतील असं कोणालाही वाटले नव्हते. त्यांनी हा निर्णय जाहीर केल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घालत हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली.

शरद पवारांच्या या निर्णयाचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटत आहे. शरद पवारांनी हा निर्णय मागे घ्यावा यासाठी राज्यभर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. पण शरद पवारांनी निवृत्त होण्याचा निर्णय का घेतला असावा असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अशामध्ये 'शरद पवारांच्या राजीनाम्याचे आधीच ठरलं होतं, कालच ते याची घोषणा करणार होते.', असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला आहे.

अजित पवार यांनी सांगितले की, 'हा निर्णय कालच होणार होता. मात्र काल 1 मे असल्यामुळे निर्णय जाहीर केला नाही. आज ना उद्या हा निर्णय होणार होता.' तसंच, 'साहेब सोबत नाही. आता काही खरं नाही. आता काय करायचं? असं भावनिक होण्याचे काहीच कारण नाही. हा प्रसंग कधी ना कधी येणारच होता. 1 मे रोजी ते हा निर्णय जाहीर करणार होते. पण वज्रमूठची सभा होती. मीडियात तेच तेच चाललं असतं. त्यामुळे 2 तारीख ठरली आणि आज त्यांनी निर्णय जाहीर केला.' , असा खुलासा अजित पवारांनी केला.

शरद पवारांच्या राजीनाम्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना माहित होता. कुटुंबासोबतच चर्चा करुन त्यांनी हा निर्णय घेतला होता अशी चर्चा सध्या सुरु आहे. तर, 'शरद पवार अध्यक्ष नाही म्हणजे पक्षात नाही. असं काही नाही. एका नेतृत्वाकडे जबाबदारी द्यायची आहे. हे नेतृत्व साहेबांच्या मार्गदर्शनखाली काम करेल. साहेब म्हणजे पार्टी आहे. पवार साहेबांनी निर्णय घेतला आहे. ते लोकशाहीत लोकांचं ऐकत असतात.', असं देखील अजित पवार यांनी सांगितलं.

अजित पवारांनी पुढे म्हणाले की, 'कुणीही अध्यक्ष झाला तरी साहेबांच्या जीवावरच पक्ष हा चालणार आहे. पवारसाहेब निर्णय घेत असताना नेहमी प्रमुखांना एकत्र बसवायचे आणि चर्चा करायचे. आज साहेबांनी संपूर्ण राजकीय आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी निर्णय जाहीर केला. हा सर्वांना धक्का आहे. पक्षाचा अध्यक्ष जो होईल, तो पवारांच्या मार्गदर्शनाखालीच काम करेल.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kangana Ranaut : ५ कोटींचे दागिने अन् महागड्या अलिशान कार; संपत्ती वाचून डोळे फिरतील

Skincare Tips: चमकदार त्वचेसाठी 'हे' टिप्स करा फॉलो

Today's Marathi News Live : माझ्यासोबत जे झालं ते खूप वाईट होतं; स्वाती मालीवाल यांनी दिली पोलिसांना त्या घटनेविषयी माहिती

Adah Sharma : ‘द केरळ स्टोरी’ फेम अदा शर्मा हिच्या हटके अदा; फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Ghatkopar Hoarding Collapse Case: घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट! उदयपूरमधून भावेश भिंडेला अटक

SCROLL FOR NEXT