Rohit Pawar, Ajit Pawar
Rohit Pawar, Ajit Pawar Saam Tv
मुंबई/पुणे

...म्हणून भाजपने अजितदादांना बोलू दिले नाही; रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: पुण्यातील देहू नगरीत झालेल्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं (Narendra Modi) भाषण झालं. मात्र, या कार्यक्रमात पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचे भाषण झाले नाही. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप होत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करुन भाजपवर टीका केली आहे.

अजितदादांच्या स्पष्टवक्तेपणामुळे भाजपची नक्कीच अडचण होत असणार म्हणून, कदाचित भाजपने आजच्या कार्यक्रमात अजितदादांना बोलू दिले नाही, अशी टीका रोहित पवार यांनी भाजपवर केली.

'छत्रपतींचा तसेच क्रांतीज्योतींचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना पंतप्रधान साहेबांसमोर खडे बोल सुनावणाऱ्या अजितदादांच्या स्पष्टवक्तेपणामुळे भाजपची नक्कीच अडचण होत असणार म्हणून, कदाचित भाजपने आजच्या कार्यक्रमात अजितदादांना बोलू दिले नाही.'

'वारकऱ्यांच्या कार्यक्रमात सर्व भेद, द्वेष, अहंकार विसरून सहभागी व्हायचे असते. परंतु अहंकाराच्या आहारी गेलेल्या प्रदेश भाजपच्या नेत्यांकडून ही अपेक्षा करणे व्यर्थ आहे. अहंकाराबद्दल संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात अहंकार हा आत्मनाश घडवितो, माणसाला सत्यापर्यंत पोचू देत नाही. अहंकारी मनुष्य 'आपण मोठे आहोत' अशी भावना डोक्यात धरून गुरगुरत राहतो आणि असंच काहीसं आज प्रदेश भाजप नेत्यांचं झालं असावं. असो संत तुकोबारायांच्या दर्शनाने नक्कीच सर्वांना सद्बुद्धी प्राप्त होईल, अशी अपेक्षा!' असं ट्विट रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केले आहे.

याबाबत विविध स्तरांतून आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अजित पवार यांना पंतप्रधानांच्या कार्यक्रमात बोलू न देणे हे जाणीवपूर्वक घडले आहे, असे दिसते. गेल्या वेळीही अजित पवार यांनी पंतप्रधानांसमोर राज्यातील महत्वाच्या व्यक्तीची छत्रपती शिवराय, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भातील वक्तव्ये निदर्शनास आणून दिली होती. त्याचाच राग निघालेला यावेळी दिसून येतो, असे काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) ट्विटमधून म्हणाले.

'पीएमओकडे परवानगी मागितली होती'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देहूतील कार्यक्रमात अजित पवार यांचं भाषण झालं नाही. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असूनही देहूतील कार्यक्रमात अजित पवार यांना बोलू न देणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे, असं मला वाटते, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

अजित पवार हे पालकमंत्री आहेत. प्रोटोकॉलप्रमाणे पंतप्रधान कार्यक्रमाला आले असतील तर त्यांनाही जावं लागतं. अजित पवार यांना या कार्यक्रमात बोलायला दिलं नसेल तर ते अयोग्य आहे, असे मला वाटते. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. नेमके काय प्रोटोकॉल आहेत हे पाहावे लागेल, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

Mangoes: दीर्घकाळापर्यंत आंबे कसे ठेवाल ताजेतवाने

SCROLL FOR NEXT