Ajit Pawar with newly inducted leaders during NCP meetings ahead of the Pune Municipal Corporation elections. Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: अजित पवारांची धक्का एक्स्प्रेस सुसाट ! बड्या नेत्यांनी हाती बांधले घड्याळ

Ajit Pawar NCP Incoming Leaders List Pune: पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बड्या नेत्यांचा प्रवेश सुरू आहे. भाजप, शिवसेना आणि काँग्रेसमधील अनेक माजी नगरसेवक व पदाधिकारी राष्ट्रवादीत दाखल झाल्याने पुण्याचे राजकारण तापले आहे.

Omkar Sonawane

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या भाजपसह विविध पक्षात इन्कामिंग, आउटगोइंग सुरू झालं आहे. सत्ताधारी भाजप ने ३ दिवसांपूर्वी मुंबईत मेगा प्रवेशाचे आयोजन केलं होतं ज्यामध्ये पुणे शहरातील अनेक भागातील "बड्या" नावांनी हाती कमळ घेतलं. अवघ्या २४ दिवसांवर पुणे महापालिकेचे निवडणूक आल्यामुळे आता आजी माजी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी जिकडे आपल्याला निवडून देण्याची जबाबदारी जो पक्ष देईल तिकडे जायची तयारी करत आहेत किंबहुना प्रवेश सुद्धा करून घेत आहेत. सध्या महायुतीत असणाऱ्या भाजप, अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडे इन्कामिंग मोठ्या प्रमाणावर होतंय.

भाजप ने मेगा प्रवेश केला म्हंटल्यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुद्धा आधी पिंपरी चिंचवड आणि त्यानंतर पुणे शहरातील अनेकांना पक्षात घेण्यास सुरुवात केली. गेल्या ३ दिवसांपासून अजित पवार हे पुणे शहरात आहेत. आधी पिंपरी चिंचवड मधील इच्छुकांच्या मुलाखती त्यानंतर पक्षाच्या बैठका मग पुणे शहरातील मुलाखती आणि पुन्हा आजचा दिवस बैठका असा अजित पवारांचा गेल्या ३ दिवसांपासून पुण्यातील दौरा आहे.

पिंपरी चिंचवड मध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी "सर्वस्वपणाला लावेल" असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला आहे शहरात आणखी ताकद वाढावी म्हणून राष्ट्रवादी ने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन भोसले यांना पक्षात घेतलं. "लक्ष्य" पिंपरी चिंचवड असल्यामुळे अजित पवार यांनी पिंपरी, चिंचवड, भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघातील ३२ प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखती अजित पवार यांनी घेतल्या.भोसले, यांच्यासह भाजपच्या माजी नगरसेविका सीमा सावळे, शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवक प्रमोद कुटे यांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला. पुणे शहरात सुद्धा अनेकांचा प्रवेश काल आणि आज झाला.

४० वर्ष काँग्रेसशी एकनिष्ठ असलेले मुख्तार शेख यांची राष्ट्रवादीत एन्ट्री

महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून पुण्यात भाजप आणि शिवसेना महायुती म्हणून लढणार आहे तर अजूनही महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची बैठक सुरू असून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. अश्यातच पुण्यात काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष असलेले मुख्तार शेख यांनी त्यांच्या पुत्रासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. दोन वेळा काँग्रेसकडून नगरसेवक राहिलेले मुख्तार शेख यांनी त्यांचे पुत्र विकार अहमद शेख यांनी आज अजित पवारांची भेट घेतली

शेख म्हणाले, "गेली ४० वर्ष मी काँग्रेस पक्षाचा काम केलं. १९९२ पासून आत्ता पर्यंत मी महापालिकेची निवडणूक लढवली आहे आणि दोन वेळा नगरसेवक म्हणून सभागृहात नागरिकांचे प्रतिनिधित्व केलं. प्रत्येक पालिका निवडणुकीत तसेच लोकसभा आणि विधानसभेत काँग्रेस पक्षाने जी काही जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे मी निभावली. काँग्रेस पक्षाने आत्ता पर्यंत अल्पसंख्याक समाजाला कोणतंही नेतृत्व करण्याची संधी दिली नाही आणि हीच बाब लक्षात घेत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. येत्या निवडणुकीत आम्ही संपूर्ण समाजाला सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत."

शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्मिता कोंढरे यांच्या हाती घड्याळ

पुणे शहरातील प्रभाग क्रमांक 38 मध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून नगरसेविका राहिलेल्या तिचा कोंढरे यांनी आज अजित पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. माध्यमांची बोलताना दोन्ही राष्ट्रवादीत भेट आले आहेत असं त्यांनी घोषित करून टाकलं. प्रवेशानंतर स्मिता कोंढरे म्हणाल्या, "पक्षासोबत प्रामाणिकपणे काम केलं आहे. दादांचे खंबीर नेतृत्व नेहमी पाठीशी होतं. इथून पुढे सुद्धा दादांच्या आणि सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली चांगलं काम करू. पवार साहेबांचे जे विचार आहेत ते आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत. दोन्ही राष्ट्रवादी "ऑलरेडी" एकत्र आल्या आहेत."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महापालिका निवडणुकीत पैशांचा पाऊस, अपक्ष उमेदवाराने पकडली २० लाखांची रोकड, राजकारण खळबळ|VIDEO

Amruta Deshmukh: साडीत उंदीर,घाणेरडं वॉशरुम; पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिराच्या दयनीय अवस्थेवर मराठी अभिनेत्री संतापली

Braid Hairstyle: फंक्शन किंवा लग्नाला साधा अंबाडा बांधण्यापेक्षा ट्राय करा हे ५ सुंदर वेणीचे प्रकार

Rasmalai Recipe : मकर संक्रांत स्पेशल रसमलाई, घरीच १० मिनिटांत मिठाई तयार

Maharashtra Live News Update : बुलढाण्यात चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार डिव्हायडरवर आदळली

SCROLL FOR NEXT