BMC Election: मनसे-ठाकरे गटाची जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात; शिवडीतील 203, 204, 205 चा वाद मिटला, मातोश्रीवरच्या बैठकीत निघाला तोडगा

Shivsena And MNS Seat Sharing: मनसे आणि ठाकरे गटातील जागावाटपाचा तिढा महत्त्वाच्या बैठकीत सुटला आहे. शिवडी वॉर्ड २०३, २०४, २०५ चा वाद मिटलाय. या बैठकीसाठी मातोश्रीवर मनसेचे बाळा नांदगावकर, ठाकरे गटाचे सुधीर साळवी आणि खासदार अनिल देसाई हे उपस्थित होते.
Shivsena And MNS Seat Sharing:
Mns–thackeray Seat Sharing Talks Enter Final Stage After Matoshree MeetingSaamtv
Published On
Summary
  • मातोश्रीवरील बैठकीत मनसे–ठाकरे गटातील जागावाटपाचा तिढा सुटला

  • शिवडीतील प्रभाग क्रमांक 203, 204, 205 चा वाद अखेर मिटला

  • मुंबई महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांची तयारी अंतिम टप्प्यात

नगरपालिका, नगर परिषदांच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर महापालिकेसाठी पक्षांची तयारी सुरू झालीय. त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची बैठक सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरे गट यांच्यातील जागावाटपाच्या चर्चेचा वेग आलाय. मुंबईतील बहुतांश प्रभागांमधील मनसे आणि ठाकरे गटाचे जागावाटप पूर्ण झालंय.

परंतु दादर, शिवडी, भांडूप आणि विक्रोळी परिसरातील काही प्रभागांमधील जागेचा तिढा होता. हा तिढा आता सुटलाय. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शिवडी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २०३, प्रभाग क्रमांक २०२४, प्रभाग क्रमांक २०५ चा तिढा सुटला आहे. या बैठकीसाठी मातोश्रीवर मनसेचे बाळा नांदगावकर, ठाकरे गटाचे सुधीर साळवी आणि खासदार अनिल देसाई हे उपस्थित होते.

Shivsena And MNS Seat Sharing:
ठाकरे गटाचा बालेकिल्ला ढासळला; कोकणात चालली शिंदेंची जादू, निकाल बदलणार कोकणाचं गणित?

दरम्यान शिवडीतील दोन प्रभाग हे ठाकरे गटासाठी आणि एक प्रभाग मनसेसाठी सोडवण्यात आलाय. आता मातोश्रीवर भांडूप, विक्रोळी, दादर आणि माहीममधील काही प्रभागांच्या जागावाटपाबाब चर्चा सुरूय. विक्रोळी आणि भांडुपमधील वॉर्ड क्रमांक १०९, ११०, ११४ , ११५ या चार जागांवर दोन्ही पक्षांनी दावा केलाय. तर दादर, माहीममधील वार्ड क्रमांक १९२, १९४, १९४, १९३ या तीन वॉर्डवर ठाकरे गट आणि मनसे दोघांनीही दावा सांगितला होता. यासंदर्भात चर्चा होतेय. दरम्यान आज दिवसभरात जागावाटपाची चर्चा करुन युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Shivsena And MNS Seat Sharing:
Nagarpalika Nagar Parishad Election Result: नागपूर जिल्ह्यात भाजपला घवघवीत यश, वाचा संपूर्ण नगरपालिका आणि नगर परिषदांचा निकाल

ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यात अधिकृत युती जाहीर आज किंवा उद्या युती जाहीर होऊ शकते. युती जाहीर करण्यासाठी भव्य पत्रकार परिषद किंवा मेळावा घेण्यात येईल असं सांगितलं जात आहे. आज या संदर्भातला अंतिम निर्णय होईल. मनसे-ठाकरे गटाची इतरही महानगरपालिकेच्या जागावाटपाची चर्चा सुद्धा अंतिम टप्प्यात आहे.

भांडूपच्या वॅार्ड क्रमांक ११४ वरून ठाकरे गट आणि मनसेमध्ये रस्सीखेच सुरूय. ठाकरे गटाचे माजी आमदार रमेश कोरगावर हे आपल्या पत्नीच्या उमेदवारीसाठी येथून आग्रही आहेत. तर मनसे माजी नगरसेविका अनिषा माजगावकर यांना हा वॅार्ड सोडावा यासाठी आग्रही आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com