Ajit Pawar NCP Leader Pravin Pawar Attack Mumbra News Saam Tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar : मुंब्र्यात राजकारण तापलं, अजित पवारांच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला; धारदार शस्त्राने वार केले अन्...

Ajit Pawar NCP Leader Pravin Pawar Attack Mumbra News : राजकीय वादातून मुंब्र्यात अजित पवार गटाच्या उमेदवाराच्या पतीवर धारदार शस्त्राने हल्ला झाला. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • महापालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटात वाद

  • निवडणूक वैरातून प्रवीण पवार यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला

  • मानेवर व चेहऱ्यावर गंभीर वार; आरोपी फरार

  • मुंब्र्यात राजकीय वातावरण तापले

विकास काटे, ठाणे प्रतिनिधी

Ajit Pawar NCP Mumbra Leader Pravin Pawar Attack राज्यात २९ महापालिकेच्या महापौर पदाची खुर्ची कोणाला मिळणार यासाठी चढाओढ सुरु असतानाच मुंब्र्यातून मोठी बातमी समोर आली आहे. प्रभाग क्रमांक ३१ मधील अजित पवार गटाच्या उमेदवार मनीषा प्रवीण पवार यांचे पती प्रवीण पवार यांच्यावर, मुंब्रा येथील सम्राट नगर येथे विरोधकांनी धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पालिका निवडणुकीनंतर, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या दोन्ही गटात वाद सुरू झाले आहेत. ठाणे महापालिका निवडणुकीत प्रवीण पवार यांच्या पत्नी मनीष पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाकडून आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्या उमेदवार पल्लवी शिवा जगताप यांच्या विरोधात निवडणूकीच्या रिंगणात उतरवले होते.

मात्र मनीषा पवार यांचा पराभव झाला. निवडणुकीतील विजयानंतर प्रवीण पवार आणि शिवा जगताप यांच्यात अनेक वेळा वाद झाले होते. या वादातून प्रविण पवार यांच्यावर काल रात्री धारदार शस्त्राने हल्ला झाला. शिवा जगताप यांचे भाऊ अप्पा जगताप यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला असून हल्ल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन पळून गेला आहे.

प्रविण पवार यांच्या मानेवर आणि चेहऱ्यावर वार करण्यात आले आहेत. निवडणुकी दरम्यान झालेल्या वादातून हा हल्ला झाल्याचा आरोप प्रविण पवार यांनी केला आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यरात्री झालेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून मुंब्र्यातील राजकारण तापले असल्याचे पाहायला मिळतं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बुलढाण्यात झेंडावंदनाची तयारी करत असतानाच मुख्याध्यापकाचा धक्कादायक मृत्यू

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठीमध्ये Wild card एन्ट्री; 'त्या' स्पर्धकाला पाहताच सदस्यांना बसला 440 व्होल्टचा धक्का| VIDEO

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना दिलासा, eKYC साठी मिळणार मुदतवाढ?

Heart Attack कमी तरी मृत्यूचं कारण तेच! या सवयी हृदयासाठी घातक, डॉक्टरांनी सांगितले धक्कादायक कारण

Chandra Grahan 2026: पहिलं चंद्रग्रहण कधी लागणार? भारतात सूतक पाळावं लागेल का जाणून घ्या

SCROLL FOR NEXT