Ajit Pawar Meets Amit Shah Saam Tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar Meets Amit Shah: अमित शहा-अजित पवार भेटीवर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया; महायुतीच्या जागावाटपावरही भाष्य

Satish Kengar

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज मुंबईत लालबागच्या राजाचे दर्शन घेतेले. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची भेट घेतली आहे. या भेटीत जागावाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावरच आता शिवसेना शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाठ म्हणाले आहे की, ''अमित शहा दरवर्षी लालबागला येत असतात. आमचे सगळ्यांचे नेते असल्याने अजित पवार यांनी सर्व कार्यक्रम सोडून भेटायला गेले होते.''

संजय शिरसाठ म्हणाले आहेत की, '' कोणी किती जागा लढाव्याच्या याचा आढावा घेण्यात आला आहे. अजून जागावाटपाचा निर्णय झालेला नाही. आमच्यात कुठलाही तेढ नाही. आमच्या तिघांची कोअर कमिटी आहे, ते निर्णय घेतात. महायुतीत सर्वांना सामावून घेतले जाईल.''

दरम्यान अजित पवार आणि अमित शहा यांच्याभेटीबद्दल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की,''अमित शहा यांच्यासमवेत चर्चा झाली. आगामी विधानसभा जागा याबाबत आमची चर्चा झाली. अमित शहा यांनी सन्मानपूर्वक जागा दिल्या जातील, असं स्पष्ट केलं आहे.'' पत्रकारांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीतून निवडणूक लढवणार का? असा प्रश्न त्यांना विचारला असताना ते म्हणाले आहेत की, ''बारामतीमधून उमेदवारीबाबत वेगळा विचार होण्याचं काहीचं कारण नाही.'' त्यांच्या या वक्तव्यानंतर अजित पवार हे बारामतीमधूनच विधानसभा लढू शकता, हे स्पष्ट झालं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: परभणीत एसटीचा अपघात, एकाचा मृत्यू

Sangli News: शरद पवार- नितीन गडकरी एकाच मंचावर येणार; सांगलीमधील कार्यक्रमाचे संजयकाका पाटील यांच्याकडून निमंत्रण

Maharashtra Politics: विधानसभेच्या तोंडावर अजित पवारांना मोठा धक्का, OBC चा बडा नेता शरद पवार गटाच्या वाटेवर

Mumbai -Pune Travel: मुंबई- पुणे प्रवास होणार सुसाट, अवघ्या २ तासांत पोहचणार; कसं ते वाचा सविस्तर

Gold Rate Today : सलग दुसऱ्या दिवशी सोन्यासह चांदी नरमली; वाचा किती स्वस्त झाला भाव

SCROLL FOR NEXT