ajit pawar  saam tv
मुंबई/पुणे

अजित पवार कार्यक्रमाला पहिल्यांदाच पोहचले उशिरा; लगेच दिलगिरीही व्यक्त केली

विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे प्रसिद्ध आहेत.

साम टिव्ही ब्युरो

पुणे: विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे प्रसिद्ध आहेत, ते एखाद्या कार्यक्रमाला जात असताना दिलेल्या वेळेच्या अगोदरच पोहचतात. पवार हे वेळेला पक्के आहेत, त्यामुळे ते ज्या कार्यक्रमाला उपस्थित असतात, त्यात इतर मंडळीही लवकर येत असतात. अतंत्य शिस्तप्रिय नेता म्हणून त्यांना ओळखले जाते. अजित पवार त्यांच्या कामाचा धडाका पहाटे सहापासूनच सुरू करतात. पण आज पुण्यातील एका कार्यक्रमाला चक्क अजित पवार उशिरा आले.

आज पुण्यात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) त्यांयांच्याहस्ते सोमवार पेठेतील राष्ट्रवादीच्या युवक कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते अजित पवार उशिरा पोहोचले. त्यामुळे अजित पवार यांना लगेच दिलगिरी व्यक्त केली. गेल्या कित्येक वर्षात पहिल्यांदा कुठल्यातरी कार्यक्रमाला उशिरा पोहचले असल्याचा चर्चा कार्यक्रमस्थळी सुरू होत्या. (Ajit Pawar Latest News)

कार्यक्रमात बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी कार्यक्रमाला माझ्याकडून उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. शिंद-फडणवीस सरकार सत्तेत येऊन बराच काळ लोटला आहे. पण अजुनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही, यावरुन आता विरोधकांडून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका होत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनाही टीका केली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार दिल्लीतील सिग्नलशिवाय होत नाही, असा टोला अजित पवारांनी लगावला.

मंत्रिमंडळ विस्तारा संदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या तोंडातून लवकरच, लवकरच, लवकरच इतकेच शब्द येत आहेत. होईल, होईल.. पण कधी होईल याचे उत्तर यांच्याकडे नाही. महाराष्ट्रात चांद्यापासून ते बांद्यापर्यंत अनेक प्रश्न आहेत. अतिवृष्टी, पाऊस, शिक्षणाशी संबंधित पालक आणि विद्यार्थ्यांसमोरील अडचणी आहेत याची जबाबादारी कोण घेणार ? यावेळी पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SBI ATM Charges: स्टेट बँकेचा ग्राहकांना झटका! ATM मधून पैसे काढणे आता महागलं; वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मतदानाच्या आदल्या दिवशी मिळणार ३००० रुपये, काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य

धोनीसोबतही असेच होतं... रोहित बाद झाल्यानंतर विराट कोहली कुणावर भडकला, मैदानावर नेमकं काय झालं?

Maharashtra Live News Update : अजित पवारांचं देवेंद्र फडणवीस यांना शायरीतून प्रत्युत्तर

MNC Election: संजय राऊतांची फडणवीसांसोबत थेट ११ लाखांची पैज, नेमकं कारण काय? | VIDEO

SCROLL FOR NEXT