ajit pawar Saam Tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar: केंद्राच्या अर्थसंकल्पाकडे लक्ष, त्यावर राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत विचार होईल - अजित पवार

प्रजासत्ताक दिनानिमित्त पुण्यातील पोलीस मुख्यालयातील मैदानावर अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे: प्रजासत्ताक दिनानिमित्त पुण्यातील पोलीस मुख्यालयातील मैदानावर उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. तसेच, यावेळी फिरत्या पशुचिकित्सालयासाठी 10 वाहनांचे लोकार्पण अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. त्यावेळी अजित पवारांनी माध्यमांशी संवांद साधला (Ajit Pawar Hoisted Flag On Republic Day On The Grounds Of The Police Headquarters In Pune).

"प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. कोरोनाचे (Corona) सावट असल्याने साधेपणाने कार्यक्रम होत आहे. नेहमीसारखी परेड घेता आली नाही कारण गर्दी करायची नाहीये. राज्यातील 51 पोलिसांना पदकं बहाल करण्यात आलीत. तसेच, पद्म पुरस्कार जाहीर करणण्यात आली त्यांचं अभिनंदन आणि कौतुक" असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

"संविधान महत्वाचे आहे, हे आज प्रत्येक बाबतीत जाणवतं. प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व नव्या पिढीला देखील कळायला लागलं आहे. ती समाधानाची बाब आहे".

11 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडणार

"येत्या 11 मार्चला मी अर्थसंकल्प (Budget) मांडणार आहे. केंद्र सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. त्यावेळी केंद्रीय अर्थसंकल्प कसा मांडला जातो त्यावर राज्याचा अर्थसंकल्पाबाबत विचार होईल", असंही त्यांनी सांगितलं.

"जीएसटी (GST) हा नवीन टॅक्स आहे. आधी सेल टॅक्स आणि आयबीटी होता, त्यातून पालिका, नगरपंचायती चालायच्या. मनमोहन सिंग यांच्या काळात वन नेशन वन टॅक्सचा विचार झाला होता. अंमलबजावणी पंतप्रधानांच्या काळात झाली".

"3 री लाट व्यवहारावर फार परिणाम झालेला दिसून येत नाही, जो फटका पहिल्या लाटेत झाला. 5 वर्षतील जीएसटीचा परतावा जो मिळायला हवा होता तो पूर्ण मिळालेला नाही. उशिरा का होईना तो मिळेल."

ObC आयोगाला पूर्णपणे स्वायत्तता - अजित पवार

"ओबीसी आयोगाला पूर्णपणे स्वायत्तता आहे. त्यांना दिशा देण्याचा अधिकार राज्याला नाही. त्यांना माहिती, हवी असेल तर राज्य देऊ शकेल. निर्णय आयोगाला घाययचा आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या मतानुसार राज्य सरकार या मताशी आहे. 50 टक्क्यांच्या पुढे आरक्षण जात कामा नये".

मविआला अडचण न येता प्रत्येक जण पक्ष वाढवायचा प्रयत्न करतंय - अजित पवार

"उद्या राष्ट्रवादी भवन मध्ये कार्यक्रम होतो, महाविकास आघाडीला अडचण न येता प्रत्येक जण पक्ष वाढवायचा प्रयत्न करत आहे", असंही त्यांनी सांगितलं.

"सध्या राज्याचा अर्थसंकल्पाकडे जास्त लक्ष"

"काही गोष्टी दाखवायच्या नसतात. 92 पासून मी कामाला सुरुवात केलीये.कितीतरी निवडणुका लढवल्या आहेत. सध्या राज्याचा अर्थसंकल्प याकडे जास्त लक्ष आहे, व्यस्त आहेत. निवडणुकी संदर्भात काही गोष्ट मिडियासमोर उघड उघड सांगायच्या नसतात", असं ते म्हणाले.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT