Ajit Pawar
Ajit Pawar  saam tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar News : तसला चावटपणा चालणार नाही, अजित पवारांनी कार्यकर्त्यांना का दिली तंबी?

मंगेश कचरे

Ajit Pawar : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधकांवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं आहे. विरोधक बारामतीत येतात आणि वाटले त्या शब्दांत टीका करतात. सत्तेत असणाऱ्या काही बारामतीमधील पदाधिकाऱ्यांनी सांगवं एवढी वर्षे सत्ता असताना, बारामतीसाठी काय आणलं. विरोधक नुसती टीका करतात आणि थातूरमातृर बोलत असतात.

त्यामुळे अशा वाचाळविरांकडे आपण लक्ष न देता आपली लोकांशी नाळ जोडत चला, असं अजित पवारांनी म्हटलं. कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती, कृषी उत्पन्न बाजार समिती निरा-पुरंदर व बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. (Political News)

यावेळी अजित पवारांनी सध्या कार्यरत असलेल्या बूथ कमिटीच्या कार्यकर्त्यांना अशी सूचना केली की, आजपासून प्रत्येक बुथ प्रमुखांनी 25 कुटुंबाशी समन्वय वाढवा. कुटुंबियांच्या काही अडचणी असतील तर त्या तालुकाध्यक्षांना सांगा. पण फक्त समन्वय ठेवा,बाकीचं काही करू नका. माझ्यापर्यंत तक्रारी येतील असं काही करू नका.

कुणाचा नंबर घेऊन व्हॉट्सअॅप मेसेज पाठवू नका. ओळख झाली म्हणून मेसेज पाठवतो तसला चावटपणा अजिबात चालणार नाही. नाहीतर नको तेवढा संपर्क होईल आणि पक्षाचा फायदा होण्याऐवजी तोटा होईल, असं मिश्किल टोलाही अजित पवारांनी लगावला.

पुढे अजित पवारांनी म्हटलं की, सत्ता असताना अधिकाऱ्यांबरोबर चांगलं वागलो असल्याने ते देखील माझ्याशी चांगले वागतात. त्यामुळे माझी कामे पटापट होतात. त्यांना देखील माहित आहे की हा बाबा कधीही सत्तेत येईल. आपण काही सत्तेसाठी हापापलेलो नाही. कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन येत नाही.

उद्धव ठाकरे यांचं पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव काढुन घेतलं, यात सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय असेल तो सर्वांना मान्य असेल. फक्त काहीजण सोडले तर शिवसेनेचे कार्यकर्ते कुठेही गेलेले नाहीत, असंही त्यांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping Promblem: रात्री चांगली झोप लागत नाही, आहारात करा बदल

Lok Sabha Election: नवी मुंबईत भाजपमध्ये फूट?, मंदा म्हात्रे यांचं मोठं वक्तव्य

Health Tips: तुम्हाला वारंवार पोटाचे विकार होतात का? आहारात 'या' गोष्टीचा करा समावेश

Maharashtra Politics 2024 : ...म्हणून नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे यांना फोन करायचे: देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्या घटनेमागचं सत्य

Vivo V30e 5G भारतात लॉन्च; 50MP फ्रंट कॅमेऱ्यासह मोबाईलमध्ये आहेत अनोखे फीचर्स, जाणून घ्या किंमत

SCROLL FOR NEXT