Uddhav Thackeray on Rahul Gandhi: उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना भर सभेतून ठणकावलं, काय म्हणाले?

Uddhav Thackeray Speech: उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना भर सभेतून ठणकावलं.
Uddhav Thackeray-Rahul Gandhi
Uddhav Thackeray-Rahul GandhiSaam TV

Uddhav Thackeray on Rahul Gandhi: उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, दादा भुसे यांच्यावर घणाघात केला. याच सभेतून उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरुन राहुल गांधींनाही भर सभेतून ठणकावलं.

उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्या आपली सुरु असलेली लढाई लोकशाहीची आहे. सावरकर आमचं दैवत आहेत. आमच्या दैवतांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. सावरकरांनी जे केलं येड्यागबाळ्याचं काम नाही.

Uddhav Thackeray-Rahul Gandhi
Uddhav Thackeray News : 'मुख्यमंत्र्यांना भाषण वाचता येतं, पण...'; उद्धव ठाकरेंचा CM एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल

ज्या सावरकरांनी 14 वर्षे अनन्वित छळ सोसला आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. ते सावरकर पण आज बघत असतील की मी मिळवून दिलेलं स्वातंत्र्य हे कसं जपत आहेत. आपण लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. मात्र आपल्याला तोडण्याचं काम केलं जातंय. त्यासाठी आपल्याला डिवचलं जात आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

भाजपमध्ये जे सावरकर भक्त आहेत त्यांना देखील सांगतो, तुम्ही सावरकर भक्त आहात ना, तर आपण सावरकर भक्त म्हणून हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी एकत्र आले पाहिजे, असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.

Uddhav Thackeray-Rahul Gandhi
Sanjay Raut On Dada Bhuse: मालेगावातील ढेकूण चिरडायला तोफेची गरज नाही, संजय राऊतांचा दादा भुसेंवर हल्लाबोल

मुख्यमंत्र्यांना भाषण वाचता येतं, पण शेतकऱ्याचं पत्र वाचता येत नाही

शेतकर्‍याला केवळ हमी भाव नाही, तर हमखास भाव मिळायलाच पाहिजे हा माझा आग्रह होता. मला उत्तर द्यायला उत्तरसभा घेणार आहात ना? रतनकाका सारख्या शेतकर्‍याला जे तुमच्या नाकर्तेपणामुळे पिचले गेले आहेत. त्यांना आधी उत्तर द्या, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना केलं.

स्वत:च्या रक्ताने शेतकर्‍याने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. पण रक्ताने पत्र लिहूनही मुख्यमंत्र्याला वाचता येत नाही. भाषण बरं वाचता, पण माझ्या शेतकर्‍याच पत्र वाचू शकत नाही? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com