Jitendra Awhad Letter To Rahul Narvekar Saam Tv
मुंबई/पुणे

Jitendra Awhad Letter To Rahul Narvekar: मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या ९ आमदारांना आमच्यासोबत बसवू नये; जितेंद्र आव्हाडांचं विधानसभा अध्यक्षांना पत्र

Maharashtra Monsoon Session 2023: मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या ९ आमदारांना आमच्यासोबत बसवू नये; जितेंद्र आव्हाडांचं विधानसभा अध्यक्षांना पत्र

साम टिव्ही ब्युरो

Jitendra Awhad Letter To Rahul Narvekar: सोमवारपासून राज्याच्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. याआधीच राष्ट्रवादी पक्षाने अजित पवार गटाविरोधात पावले उचलायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीत मोठी फूट पाडत अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी शिवसेना आणि भाजप सरकारमध्ये सामील होत मंत्रिपदाची शपथ घेतली.

अशातच पावसाळी अधिवेशनात या ९ मंत्र्यांची आसन व्यवस्था राष्ट्रवादीच्या आमदारांपेक्षा वेगळी करावी, असं पत्र विधानसभेतील राष्ट्रवादी पक्षाचे मुख्य प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पाठवलं आहे.

काय लिहिलं आहे पत्रात?

आव्हाड यांनी नार्वेकर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, ''महाराष्ट्र विधीमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते जयंत पाटील यांच्या आदेशानुसार आपणांस कळविण्यांत येत आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ९ सदस्यांनी मंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. या ९ सदस्यांना वगळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उर्वरित सर्व सदस्यांची विधानसभा सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची विरोधी पक्षासाठी असणाऱ्या आसनावर बसण्याची व्यवस्था करण्यांत यावी.'' (Latest Marathi News)

तत्पूर्वी, अजित पवार गटाने आज शरद पवार यांची भेट घेतली आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. पवार यांची भेट घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत, प्रफुल्ल पटेल, मंत्री छगन भुजबळ, मंत्री धनंजय मुंडे यांच्यसह इतर अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते.

शरद पवार यांच्या भेटीनंतर अजित पवार गटाच्या वतीने माध्यमांशी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत की, ''शरद पवार आमचे सर्वांचे आदरनीय नेते शरद पवार म्हणून त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही येथे आलो होतो. वेळ न मागता आम्ही येथे आलो. आम्हाला समजलं होतं की ते येथे आहेत. त्यामुळे संधी साधून आम्ही सगळे येथे आलो. आम्ही पवार साहेबांकडे आशिर्वाद मागितले. पक्ष एकसंध कसा राहू शकतो, यासाठी त्यांनी विचार करावा यासाठी आम्ही त्यांच्याकडे विनंती केली आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींची न्यायालयाने निर्दोष सुटका केल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांकडून जल्लोष

Raksha Bandhan 2025: शास्त्रानुसार राखी कोणत्या हाताला बांधावी?

HBD Kiara Advani : सुंदर दिसण्यासाठी कियारा अडवाणी लावते 'हा' फेसपॅक, फक्त ५ रूपयांत घरीच होतो तयार

Bank Loan Recovery : 'आधी पैसे दे, नंतर बायकोला घेऊन जा', कर्जाचे पैसे न दिल्याने बँकेने महिलेला नेलं उचलून

Murud-Janjira To Vasai Fort: मुरुड जंजिरा किल्ल्यापासून वसई किल्ल्यापर्यंत जायचंय? वाचा सर्वोत्तम वाहतुकीचे पर्याय

SCROLL FOR NEXT