Ajit Popat Pawar NCP candidate ward 25 : अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. हे वाचून तुम्हाला थोडा धक्का बसला असेल. पण हे खरेय. पण हे अजित पवार (Ajit Pawar News) उपमुख्यमंत्री अजित पवार नाहीत. तर पिपंरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad Election ) त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रभाग २५ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अजित पवार यांनी घड्याळावर उमेदवारी अर्ज दाखल केलाय, पण त्यांना अद्याप एबी फॉर्म मिळाला नसल्याचे समजतेय.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. पिंपरी चिंचवडमधील प्रभाग २५ ड या मतदार संगात अजित पोपट पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अजित पोपट पवार यांनीराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या निवडणूक चिन्हावर अर्ज भरल्यामुळे अनेकांना सुरूवातीला आश्चर्याचा धक्का बसला. पण त्यांना अद्याप अजित पवार यांच्या राष्टवादी काँग्रेसकडून एबी फॉर्म मिळाला नाही.
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार, हे नाव माहिती नसलेला राज्यात माणूस नसेल. पण पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात मैदानात उतरलेले अजित पोपट पवार हे वेगळे आहेत. दोघांच्या नावात साधर्म आहे. पण याच नावातील साधर्म्यामुळे पिंपरी चिचंवडमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार एकत्र निवडणूक लढणार असल्याचे समोर आलेय. अजित पवारांची राष्ट्रवादीचे पिंपरीचे अध्यक्ष योगेश बहल यांनी याबाबतची माहिती दिली. १२८ पैकी पिंपरीमध्ये १८ जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला म्हणजेच तुतारीला देण्यात आल्या आहेत. ३ प्रभागात म्हणजेच प्रभाग ९ आणि प्रभाग २० मैत्रीपूर्व लढत होणार आहे. शरद पवार गटाचे ४ उमेदवार अजित पवार गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट उमेदवारांची यादी उशिरा जाहीर करणार आहे. बंडखोडी टाळण्यासाठी अजित पवार गट बारा वाजता क्षेत्रीय कार्यालयावर आपला उमेदवारांना एबी फॉर्म वाटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महापालिका निवडणूक नामांकन अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. बंडखोरी टाळण्यासाठी अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करणे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघांनी टाळलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.