राज्यातील 29 महापालिका निवडणुकांना आता केवळ काही तास शिल्लक असून उमेदवारांची धाकधूक वाढले आहे. उद्या होणाऱ्या मतदानाच्या दिवशी लोक आपली मत मतपेटीत टाकणार असून 16 जानेवारीला या महापालिकांवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार हे समजणार आहे. अशातच राज्यात महायुती म्हणून सरकार असलेल्या या तीन पक्षांमध्येच आता जोरदार राजकीय घमासान पाहायला मिळाले.
विशेष म्हणजे पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये तूफान आरोप प्रत्यारोप झाले. भाजप आमदार महेश लांडगे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकमेकांवर घणाघाती हल्लाबोल केल्याचे दिसून आले. या मोठ्या राजकीय आखाड्यात आता कोण कुस्ती जिंकणार याची उत्सुकता चांगलीच शिगेला पोहोचली आहे. अशातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार बाबुराव चांदेरे यांच्या विरोधात भाजपने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
बाबुराव चांदेरे यांचे नामांकन रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात भाजपच्या उमेदवाराने धाव घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. चांदेरे यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात गुन्हेगारी प्रकरणांची माहिती लपवल्याचा आरोप करत, त्यांचे नामांकन रद्द करण्यासाठी भाजपचे उमेदवार गणेश कळमकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे
गणेश कळमकर यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेनुसार, चांदेरे यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात गंभीर स्वरूपाच्या प्रलंबित गुन्हेगारी प्रकरणांची माहिती जाणीवपूर्वक लपवून प्रशासनाची व मतदारांची दिशाभूल केल्याचा दावा करण्यात आला आहे. याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, चंदेरे यांच्यावर दोन गुन्हे प्रलंबित आहेत. या प्रकरणांमध्ये दोषारोपपत्र दाखल झालेले असून, यातील काही गुन्ह्यांसाठी २ ते १० वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे.
कळमकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, "शपथेवर खोटे बोलणे किंवा माहिती लपवणे हा केवळ तांत्रिक दोष नसून तो गंभीर गुन्हा आहे. भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २२९ नुसार खोटे पुरावे देणे हा दंडनीय अपराध आहे. यामुळे मतदारांच्या माहितीच्या अधिकारावर गदा येते."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.