Ajit Pawar addressing the media after announcing unity between both NCP factions ahead of municipal elections. saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: मोठी बातमी, अखेर काका-पुतणे एकत्र! दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती, अजितदादांची घोषणा

Sharad Pawar - Ajit Pawar NCP Yuti: महापालिका निवडणुकीपूर्वी अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीची घोषणा केली आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या युतीमुळे भाजपचं चिंता वाढली. भाजपच्या मिशन १२५ समोर मोठं आव्हान उभे राहिले आहे.

Bharat Jadhav

  • महापालिका निवडणुकांपूर्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र

  • अजित पवारांनी अधिकृतपणे युतीची घोषणा केली

  • काका-पुतणे पुन्हा एकत्र आल्याने राजकीय खळबळ

महापालिका निवडणुकांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी राजकीय पक्षांच्या अनेक तऱ्हा युत्या आणि आघाडी करत आहेत. कुठे महायुतीमधील पक्ष एकमेकांविरोधात तर कुठे एकत्र आहेत. तर कुठे राज्यातील विरोधी पक्षातील एका पक्षाशीच सत्ताधारी पक्षांनी युती केल्याचं दिसत आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नाट्यमय घडामोडी घडू लागल्या आहेत.

या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरु होती. आधी ही चर्चा फिस्कटली होती. त्यानंतर आमदार रोहित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. त्यानंतर पुन्हा दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. आता स्वत: अजित पवार यांनीची दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत निवडणुका लढणार असल्याची घोषणा केली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घोषणा केलीय. याबाबतचे वृत्त एबीपी माझाने दिलंय. दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत खासदार अमोल कोल्हे आणि रोहित पवारांनी अजित पवार गटासोबत तीन गुप्त बैठका केल्या. अखेर या बैठकांना आता मूर्तरूप आल्याचं दिसून येतंय. उद्याच या दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर होऊ शकते.

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे मिशन १२५

पिंपरी चिंचवडमध्ये महानगरपालिकेत भाजपने स्वबळाचा नारा दिला आहे. भाजपने मिशन १२५ जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलंय. भाजपकडून 'अबकी बार १२५ पार' नारा दिला जात आहे. पिंपरी चिंचवडमध्ये विरोधकांच्या फक्त तीन जागा निवडून येतील, असे भाजपकडून सांगितलंय. त्यावरुन, राष्ट्रवादीने भाजपवर टीका केली. भाजपला त्यांचा अतिआत्मविश्वास आणि घमंड नडेल. अशी टीका करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT