Ajit Pawar plane crash controversy. saam tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar Death: बारामती विमानतळावर नियमांचे उल्लंघन? धक्कादायक माहिती समोर

Baramati Airport: बारामती विमानतळाबाबत एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. बारामती विमानतळावर नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. MADCच्या सूत्रांनी साम टीव्हीला दिली. ऑडिटचा अहवाल समोर आला आहे.

Priya More

Summary -

  • अजित पवारांचा बारामतीमध्ये विमान अपघातामध्ये मृत्यू

  • बारामती विमानतळावर नियमांचे उल्लंघ झाल्याची माहिती समोर आली

  • विमानतळावर ATC कंट्रोल टॉवर आणि अग्निशमन यंत्रणा नाही

  • धावपट्टी आवश्यक निकषांपेक्षा कमी लांबीची असल्याची माहिती समोर

  • २०२५ मध्ये ऑडिट रिपोर्टमध्ये नमूद केल्यात या बाबी

सागर आव्हाड, पुणे

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. २८ जानेवारीला बारामती विमानतळाजवळ त्यांचे विमान कोसळले होते. या अपघातामध्ये अजित पवारांसह ५ जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर बारामती विमानतळावर नियमांचे उल्लंघन झाल्याची माहिती MADCच्या सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे. अहवाल सुपूर्द करुनही कारवाई झालेली नाही. बारामती येथील उड्डाण सुविधेबाबत राज्य यंत्रणांकडून वेळोवेळी करण्यात आलेल्या सुरक्षा ऑडिटमधून काही महत्त्वपूर्ण बाबी निदर्शनास आल्या आहेत. २०२५ मध्ये बारामती विमानतळाबाबत केलेल्या ऑडिटच्या निरीक्षणातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

बारामती वैमानिक प्रशिक्षण केंद्राचा सध्याचा ताबा MADC म्हणजे महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीकडे आहे. ऑडीटमधून जी निरिक्षणं समोर आली आहेत त्यामध्ये विमानतळ असणाऱ्या नियमात बारामती विमानतळ बसतच नाही त्यामुळे बारामती विमानतळाला विमानतळ म्हणू शकत नाही तर वैमानिक प्रशिक्षण केंद्र म्हणावे लागेल असे ऑडिट रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले. हा रिपोर्ट मे-जून २०२५ दरमान राज्य सरकारच्या गोपनीय यंत्रणांनी वरिष्ठ कार्यालयाकडे दिलेला होता.

बारामती विमानतळावर एटीसी यंत्रणाच नाही. या विमातळावर शासन नियंत्रण स्वतंत्र एटीएस कंट्रोल टॉवर नाही. उड्डाण नियंत्रणाची सुविधा प्रामुख्याने खासगी वैमानिक प्रशिक्षण संस्थांकडून कार्यान्वित असल्याचे ऑडिटच्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. बारामती विमानतळ परिसरात आवश्यक त्या संख्येने वॉच टॉवर उपलब्ध नाहीत. परिघीय सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा आवश्यक असल्याचे ऑडिट निरीक्षणात अधोरेखित करण्यात आले आहे. विमानतळावर वॉल कम्पाऊंड आणि वॉच टॉवरही नाही.

धावपट्टी २५०० मीटर असणं गरजेचे आहे मात्र प्रत्यक्षात याठिकाणची धावपट्टी १७०० मीटरच आहे. बारामती विमानतळावर स्वत:ची अग्निशमन यंत्रणाही नाही. बारामती विमानतळ हे विमानतळ नाही तर आपत्कालीन धावपट्टी आहे. विद्यमान अधोसंरचना आणि नियामक निकषांच्या पार्श्वभूमीवर या स्थळाला पूर्ण विकसित सार्वजनिक विमानतळाऐवजी वैमानिक प्रशिक्षण केंद्र किंवा आपत्कालीन धावपट्टी म्हणून वर्गीकृत करण्याची नोंद ऑडिट रिपोर्टमध्ये करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Hair Home Remedies: केस खूप पांढरे झालेत? शाईनपण गेली? मग वापरा 'हे' खास हेल्दी तेल

Maharashtra Live News Update : नागपुरात बालाघाट मेमू गाडी रुळावरून घसरली, मोठा अपघात टळला

इराण अमेरिकेसोबत चर्चेसाठी तयार? युद्धावरून मुस्लिम देशांत खलबतं

Chanakya Niti: आयुष्यात या ४ प्रकारचे मित्र कधीच देत नाही दगा, चाणक्यांनी सांगितलं गुपित

Iran–Israel–US conflict: एक महिन्यानंतरही युद्ध सुरूच; आखाती युद्धामुळे जगाची इंधनकोंडी

SCROLL FOR NEXT