विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांना एअरलाइन कंपनी देणार १० हजार रुपये, नुकसान भरपाईसाठी इंडिगोची अट

IndiGo Compensation Policy: इंडिगोच्या संकटामुळे नाहक त्रास सहन करणाऱ्या प्रवासांना एअरलाइन्सकडून प्रवाशांना १०००० हजार रुपये दिले जात आहेत. प्रवाशांना ५००० ते १०००० रुपयांची नुकसान भरपाई दिली जातेय. मात्र त्यासाठी कंपनीनं एक अट घातलीय.
IndiGo Compensation Policy
Published On

विमानसेवांचं वेळापत्रक कोलमडल्याने देशासह परदेशी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. देशातील अेक विमानतळावर प्रवाशी अडकून पडले होते. आता त्या प्रवशांना इंडिगोकडून नुकसान भरपाई दिली जात आहे. यातून प्रवाशांना १०,००० रुपयांचे ट्रॅव्हल व्हाउचर दिले जाणार आहे. एका निवेदनातून इंडिगोने याबाबतची घोषणा करताना म्हटले आहे की, "आमच्या ग्राहकांची काळजी घेणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे."

त्यानुसार कामकाजातील व्यत्ययानंतर आम्ही रद्द केलेल्या उड्डाणांसाठी आवश्यक असलेले सर्व परतफेड सुरू केली आहे. ज्यांना परतफेड मिळाली नाही त्यांच्या खात्यात लवकरच परतफेड जमा होईल. " तसेच ३/४/५ डिसेंबर २०२५ रोजी प्रवास करणारे आमचे काही ग्राहक काही विमानतळांवर काही तास अडकून पडले होते आणि त्यापैकी अनेकांचे मोठे नुकसान झाले. ज्या प्रवाशांचे नुकसान झाले आहे, त्यांना कंपनी १०००० रुपयांची नुकसान भरपाई देणार आहे.

व्हाउचर किती दिवस वैध असणार?

पुढील १२ महिन्यांसाठी इंडिगोच्या कोणत्याही प्रवासासाठी हे ट्रॅव्हल व्हाउचर वापरता येणार आहे. देण्यात येणारी भरपाई ही सध्याच्या सरकारी मार्गदर्शक तत्त्वांनुसार असलेल्या वचनबद्धतेव्यतिरिक्तेची आहे. यात इंडिगो ग्राहकांना फ्लाइटच्या ब्लॉक वेळेनुसार ५००० ते १०००० पर्यंतची भरपाई करणार आहे. ज्याची फ्लाइट डिपार्चर वेळेच्या २४ तासांआधी रद्द झाले आहेत. त्यांनाच ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com