Deputy Chief Minister Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्षाविरोधात बंड पुकारत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची (Deputy CM) शपथ घेतली. अजित पवारांनी ५ वर्षांच्या सरकारच्या काळात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी पुकारलेल्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मोठा भूकंप झाला. राज्याचे नवे उपमुंख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार यांनी ट्विटरवरील (Ajit Pawar Twitter Account) आपला बायो बदलला.
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांनी (Ajit Pawar) आपल्या ट्विटर अकाऊंटवरील प्रोफाईल बदलले आहे. त्यांनी आपल्या प्रोफाईलवरील पक्षाच्या झेंड्याचा लावलेला फोटोच्या जागी स्वत:चा फोटो टाकला आणि बायोमध्ये 'उपमुख्यमंत्री' (Deputy Chief Minister) पदाचा उल्लेख केला. अजित पवार यांनी ट्वीटरवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री ही आपली नवीन ओळख बायोमध्ये टाकली आहे.
अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहे. आपल्यासोबत राष्ट्रवादीचे 35 आमदार असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे. त्याचसोबत त्यांनी पक्षाचे चिन्ह आणि नावावर देखील दावा केला आहे. अजित पवारांच्या या निर्णयामुळे शरद पवारांना मोठा धक्का बसला. तर दुसरीकडे राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.
अजित पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या काही आमदारांची बैठक बोलवली होती. या बैठकीला सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, अमोल कोल्हे यांच्यासह जवळपास 18 आमदार उपस्थित होते. मात्र या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील गैरहजर होते. या बैठकीनंतर अजित पवार हे सर्व आमदारांना घेऊन थेट राजभवनाच्या दिशेने निघून गेले. त्यानंतर त्याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील दाखल झाले. त्यानंतर अजित पवार यांचा शपथविधी सोहळा झाला
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, धर्मरावबाबा अत्राम, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी खासदार सुनील तटकरे आणि अमोल कोल्हे या दोन्ही खासदारांनी अजित पवारांना पाठिंबा देत शपथविधीला उपस्थिती लावली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.