Air Pollution Saam Tv
मुंबई/पुणे

Air Pollution: मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली, राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय, आता यापुढे....

Air Pollution In Mumbai: महानगर क्षेत्रातील महापालिकेच्या हद्दीत नवीन रेडी-मिक्स काँक्रीट प्लांट उभारण्यास आता परवानगी दिली जाणार नाहीये.

Bharat Jadhav

मुंबईतील हवेची गुणवत्ता खालवत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यावर चिंता व्यक्त केलीय. हवेची गुणवत्ता अधिक खालावत असल्याने महानगर क्षेत्रातील महापालिकेच्या हद्दीत नवीन रेडी-मिक्स काँक्रीट प्लांट उभारण्यास यापुढे परवानगी दिली जाणार नाहीये . तर सुरू असलेल्या प्लांट्सना पुढील तीन महिन्यांत प्रवेश आणि निर्गमन गेट्सवर धूळ प्रतिबंधक पडदे लावणे, तसेच वाहनांच्या टायरांवर पाणी फवारणी करणे बंधनकारक असेल.

या नवीन नियमांचे पालन न केल्यास बँक गॅरंटी जप्त करणे किंवा प्लांट बंद करणे यासारख्या कडक कारवाईचा सामना या कंपन्याना करावा लागू शकतो. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश रामदास कदम यांनी मुंबईच्या वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय.

महानगर क्षेत्राबाहेर, महापालिका हद्दीत नसलेल्या भागात बांधकामाजवळ उभारल्या जाणाऱ्या नवीन कॅप्टिव्ह RMC प्लांटला एकूण मिळालेल्या जमिनीच्या 10% भागावर उभारणे आवश्यक असणार आहे. तसेच ते संपूर्णतः सर्व बाजूंनी टिन किंवा तत्सम सामग्रीच्या बंदिस्त रचनेत असावे. यासाठी बँक गॅरंटी म्हणून 10 लाख रुपये जमा करून पुढील तीन महिन्यांत हे नियम पूर्ण करावे लागतील.

MPCB च्या अधिसूचनेत म्हटले आहे की, बांधकामाचे 70% काम पूर्ण झाल्यावर किंवा ताबा घेतल्यानंतर प्लांट एका महिन्यात हलवावा किंवा तोडून टाकावा लागणार आहे. मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत असून एक्युआय हा ११८ वर पोहोचलाय. मुंबईची हवेची गुणवत्ता हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर बिघडते. ‘वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट २०२३’ च्या नुसार, जानेवारी २०२३ मध्ये मुंबईतील PM २.५ पातळीमध्ये २०२२ च्या तुलनेत २३ टक्के इतकी वाढ झाली होती.

यामुळे मुंबई हिवाळ्यात जगातील सर्वाधिक प्रभावित शहरांपैकी एक ठरली. यावर प्रशासनाने योग्य पावलं ऊचलणं बंधनकारक आहे. नोव्हेंबर महिन्यातील २८ तारखेला मुंबईमधील गेल्या आठ वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली होती. मुंबईमधील नीचांकी तापमान हे १६.८ अंश इतक होत याची नोंद हवामान खात्याकडून करण्यात आली. अशा प्रकारचं थंडीच वातावरण पुढील काही दिवस असणार असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता. या परिस्थितीनंतर मुंबईची हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रादेशिक एअरशेड धोरणाची गरज असल्याचे अभ्यासकांनी आपलं मत मांडलं होतं.

आधी नोव्हेंबर महिन्यातील ६ तारखेला मुंबईतील शिवडी, वरळी तसेच वांद्रे – कुर्ला संकुल येथे ‘वाईट’ हवेची नोंद झाली. ‘समीर’ ॲपनुसार ६ तारखेला मुंबईच्या हवेचा निर्देशांक ११४ वर पोहोचला होता. मुंबईत सध्या आर्द्रता असल्याने सकाळी प्रदूषके साचून राहतात. समीर ॲपच्या नोंदीनुसार ६ नोव्हेंबरच्या दिवशी सकाळी शिवडी येथील हवा निर्देशांक २२६, तर वरळी येथील २२५ इतका होता. तसेच खेरवाडी-वांद्रे २०५, वांद्रे -कुर्ला संकुल हवा निर्देशांक २२५ इतका होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunil Shelke: महाराष्ट्रातील आमदारांच्या हत्त्येचा कट?आमदाराला संपवण्याचा डाव कुणाचा?

Wardha News : धावत्या दुचाकीवर वीज कोसळली; मुलासह वडिलांचा करुण अंत, पुतण्याची मृत्यूशी झुंज

Modi Government: मोदी देणार विद्यार्थ्यांना 1 कोटी? आयडिया देणारा होणार मालामाल?

Mumbai Police : एसीबीची मोठी कारवाई; मुंबई पोलीस दलातील २ बड्या अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं

Chhagan Bhujbal: आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार, ओबीसींसाठी भुजबळांचा एल्गार

SCROLL FOR NEXT