Plane Crash : गुजरातच्या अहमदाबादमध्ये काल (१२ जून) एअर इंडियाच्या प्रवासी विमानाचा भीषण अपघात झाला. दुपारच्या सुमारास अहमदाबादहून लंडनला निघालेले विमान कोसळले. उड्डाणानंतर अवघ्या काही सेकंदांमध्ये विमान मेघानीनगर परिसरात कोसळले. या विमान अपघातात आत्तापर्यंत २६५ जणांचे मृतदेह हाती लागल्याचे म्हटले जात आहे.
एअर इंडियाचे बोईंग 787 ड्रीमलायनर विमान AI-171 टेकऑफनंतर ७०० फुटाहून खाली कोसळले. या विमानात दोन पायलट, क्रू मेंबर्स, प्रवासी असे एकूण २४२ जण होते. या विमानातील विश्वास कुमार रमेश हा एकमेव प्रवासी अपघातात बचावला. घटनास्थळी मृतदेहांची डीएनए चाचणी करणे, अवशेष बाहेर काढणे असे काम सुरु आहे. या घटनेमुळे देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. यादरम्यान अहमदाबादसारखी घटना जर कुर्ला बैल बाजार झोपडपट्टी परिसरात घडली, तर मुंबईत मोठी जीवितहानी होईल अशी भीती शिवसेनेच्या आमदाराने म्हटले आहे.
'मुंबई विमानतळाजवळ मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे. अहमदाबादप्रमाणे मुंबईच्या परिसरात विमान दुर्घटना घडली, तर मोठी जीवितहानी होईल. मुंबईच्या विमानतळाच्या जवळ कुर्ला बैल बाजार झोपडपट्टी आहे. तेथून कमी उंचीवरुन अनेक विमान उड्डाणे होत असतात. जर तेथे काही अपघात झाला, तर मोठी दुर्घटना होऊ शकते', असे वक्तव्य आमदार दिलीप लांडे यांनी केले आहे.
आमदार लांडे म्हणाले , 'हा प्रश्न मी विधानसभेतही उपस्थित केला होता. त्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांनी मला यासंदर्भात आश्वासन दिले होते. आता आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पुन्हा एकदा अधिकृतरित्या या झोपडपट्टीच्या हटवणीसाठी मागणी केली आहे. यासंदर्भात लवकरच आम्ही पत्राद्वारेही निवेदन देणार आहोत. या परिसरातील झोपडपट्टी लवकरात लवकर हटवली गेली पाहिजे, कारण जर अहमदाबादसारखी एखादी दुर्दैवी घटना येथे घडली, तर मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची शक्यता आहे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.