CM Eknath Shinde Has Facing Power Cut Issue Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai: मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची बत्ती गुल! पालिकेत शिवसेनेची सत्ता असतानाही वीजपुरवठा खंडीत

CM Eknath Shinde Has Facing Power Cut Issue : बेस्टच्या कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे. बंगल्यासमोरच ५ फूटांचा खड्डा खोदण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अग्रदूत बंगल्याची (Agradoot Bungalow) वीज गुल (Power Supply Cut) झालेली आहे. सध्या तात्पुरत्या स्वरुपात वीजजोडणी करण्याता आली आहे. बेस्टची केबल जळाल्याने वीज गुल झाली आहे. बेस्टच्या (Best) कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे. बंगल्यासमोरच ५ फूटांचा खड्डा खोदण्यात आला आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी आणखीन २ ते ३ दिवस लागणार असल्याची माहिती मिळत आहे. बेस्ट मनपाच्या अखत्यारीत आहे, तर मनपात शिवसेनेची सत्ता होती, तरिही वीजपुरवठा खंडीत झाला आहे. (Eknath Shinde Latest News)

हे देखील पाहा -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागच्या सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना त्यांना अग्रदूत हा शासकीय बंगला मिळाला होता. आताही सध्या हा बंगला मुख्यमंत्र्यांच्या ताब्यात आहे. याच बंगल्याला लागून नंदनवन हा देखील शासकीय बंगला त्यांच्याकडे आहे. या बंगल्यांना बेस्ट उपक्रमाकडून (Brihanmumbai Electric Supply and Transport) वीजपुरवठा होतो. अग्रदूत बंगल्याला वीजरपुरवठा करणारी बेस्टची केबल जळाल्याने याठिकाणी वीज गुल झाली आहे.

विशेष म्हणजे बेस्ट उपक्रम हा मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येतो. मुंबई महानगरपालिकेत अनेक वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. असं असतानाही थेट मुख्यमंत्र्यांच्याच घराची बत्ती गुल झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. लवकरच मुंबई महापालिकेच्या निवडणुकाही होणार आहेत.

शिवसेनेचे (ShivSena) ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले. भाजपसोबत जात शिंदे गटाने सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

दरम्यान शिवसेनेने शिंदे गटावर कारवाई करत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाने शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला आहे. आता शिवसेना कोणाची या संदर्भात ८ ऑगस्ट रोजी निवडणूक (Election) आयोगाने पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.शिंदे गट आणि शिवसेनेकडून ८ ऑगस्ट रोजी १ वाजेपर्यंत लेखी पुरावे देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता मुळ शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह कोणाकडे राहणार याचा निकाल ८ ऑगस्ट रोजी समोर येणार आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात पावसाचा कहर, ओढ्याला पूर आल्यामुळे पिंगळी लिमला रस्त्यावरची वाहतूक बंद

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

Palak Curry Recipe : पालक करी अन् गरमागरम चपाती, रविवारचा हेल्दी बेत

Court Attack : कोर्टावर दहशतवादी हल्ला; 8 जणांचा मृत्यू, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT