संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्यानंतर त्याचे पडसाद राज्यातील नागपूर अधिवेशनातही उमटले आहेत. लोकसभेत दोन प्रेक्षकांनी गॅलरीतून सभागृहात उड्या मारल्याची घटना घडली. या घटनेनंतर राज्यात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनातही गॅलरी पासेस देणे बंद केले आहे. विधीमंडळाने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)
लोकसभेत 'घुसखोरां'नी गॅलरीतून सभागृहात उड्या मारून स्मोक कॅण्डल पेटवल्या. या घटनेनंतर सर्व खासदारांची एकच पळापळ झाली. या 'घुसखोरां'नी स्मोक कॅण्डल फेकल्यानंतर त्यातून धूर निघू लागला.
या घटनेनंतर काही खासदारांनी या 'घुसखोरां'ना सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिलं. या घटनेनंतर सभागृहाचं कामकाज दुपारी दोन वाजता तहकूब करण्यात आलं. या घटनेचे महाराष्ट्रातही पडसाद उमटले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
लोकसभेच्या घटनेनंतर नागपूर अधिवेशनातही आता गॅलरी पासेस देणे बंद केले आहे. विधीमंडळाने दोन्ही सभागृहातील गॅलरी पासेस देणे बंद केले आहे. लोकसभा गॅलरीतून दोघांनी सभागृहात उडी मारल्याने विधिमंडळाने तात्काळ निर्णय घेतला आहे. विधान परिषद उपासभापती डॉ निलम गोऱ्हे यांनी ही सभागृहात माहिती दिली.
लोकसभेतील घटनेनंतर राज्यातील विधानभवन परिसरात सुरक्षा वाढविण्यात आली आहे. विधानभवन परिसरातील सर्व हालचालींवर पोलीस यंत्रणा लक्ष ठेवून असल्याची माहिती आहे. लोकसभेत सुरक्षा भेदणारे काही तरुण महाराष्ट्राची माहिती मिळाली आहे.
लोकसभेत नेमकं काय घडलं?
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी सांगितलं की, लोकसभा सभागृहात दोन जणांनी उड्या मारल्या. या दोन जणांनी उड्या मारून काहीतरी फेकलं, यामुळे गॅस निघू लागला. सभागृहातील खासदारांनी या दोघांना पकडलं. खासदारांनी या दोघांना सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.